← Bye-Laws/#43
EN
Bye-law 43Ch.3 · सदस्यत्व

सदनिका पोटभाड्याने देणे, इत्यादी

अधिकृत मजकूर
संस्थेच्या परवानगीशिवाय पोटभाडयाने देणेस,इत्यादीस परवानगी नसणे. 43 (अ) सदस्य, संस्थेला आपली सदनिका पोटभाडयाने व संमती-नि- परवाना पध्दतीने किंवा काळजीवाहक तत्वावर किंवा कोणत्याही अन्यप्रकारे पेईंगगेस्ट तत्वावर दिल्याचे लेखी कळवील . तथापि सदस्य संमति-नि-परवानगी कराराची व संस्थेस दिलेल्या लेखी पत्राची प्रत संबंधित पोलीस स्टेशनमध्ये सादर करील. पोटभाडे, इत्यादीसाठी परवानगी मिळण्यासाठी अर्ज. (ब) सदनिका / दुकान पोटभाडयाने देण्यासाठी संस्थेच्या परवानगीची गरज नाही. तथापि ते पोटभाडयाने देण्यापूर्वी 8 दिवस अगोदर संस्थेला तशा प्रकारची सूचना देण्यात यावी.

या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?

मोफत नमुने तयार करा

हा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?

उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.

उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.