Bye-law 44Ch.3 · सदस्यत्व
सदनिकेत राहण्याच्या हक्काच्या तबदिलीवर निबंध
अधिकृत मजकूर
सदनिकेत राहण्याच्या हक्कावर तबदिलीवर निर्बंध.
44) कोणताही सदस्य संस्थेच्या लेखी पूर्वपरवानगीशिवाय, आपला भोगवटयाचा हक्क अभिहस्तांकित करणार नाही, गहाण ठेवणार नाही किंवा त्यावर कोणत्याही प्रकारचा बोजा निर्माण करणार नाही.
परंतु सदस्याला एकतर सदनिका खरेदीसाठी कर्ज काढण्याच्या प्रयोजनार्थ अथवा उक्त प्रयोजनासाठी नियोक्त्याकडून किंवा भारतीय आर्युविमा महामंडळाकडून किंवा सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य पुणे यांनी मान्य केलेल्या बँकेकडून / संस्थेकडून किंवा अन्य एजन्सीकडून घेतलेल्या कर्जाची किंवा आग्रिमाची परतफेड करण्याच्या प्रयोजनार्थ आपल्या भोगवटयाचा हक्क अभिहस्तांकित करण्यासाठी, गहाण ठेवण्यासाठी किंवा त्यावर अन्य प्रकारे बोजा निर्माण करण्यासाठी वरीलप्रमाणे संस्थेच्या संमतीची आवश्यकता असणार नाही.
← Previous
43. Sub-letting etc. not permissible except under the Society's permission
Next →
45. Flats to be maintained
या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?
मोफत नमुने तयार कराहा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?
उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.
उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.