Bye-law 34Ch.3 · सदस्यत्व
संस्थेच्या भांडवलात/मालमत्तेत असलेले मृत सदस्याचे भाग व हितसंबंध नामनिर्देशित व्यक्तीकडे हस्तांतरित करणे
अधिकृत मजकूर
संस्थेचे भांडवल / मालमत्ता यामध्ये असलेले मयत सदस्याचे भाग व हितसंबंध नामनिर्देशित व्यक्तीकडे / व्यक्तींकडे हस्तांतरित करणे.
34. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 1960 चे कलम 30 तसेच उपविधी 17 (अ) किंवा 19 याच्या तरतुदींच्या अधीन राहून सदस्याच्या मृत्यूनंतर सदर संस्था, मयत सदस्याचे संस्थेच्या भांडवलात / मालमत्तेत असलेले भाग व हितसंबंध त्या नामनिर्देशित व्यक्तीकडे/व्यक्तींकडे हस्तांतरित करील आणि जर ही मालमत्ता मयत सभासद आणि सहयोगी सभासद यांनी एकत्रितपणे खरेदी केलेली असेल तर मयत सदस्याने धारण केलेले संस्थेच्या भांडवलातील / मालमत्तेत असलेले भाग व हितसंबंध याच्या प्रमाणात ते नामनिर्देशन केलेल्या व्यक्तीकडे/व्यक्तींकडे हस्तांतरित करील. नामनिर्देशित व्यक्तीने/व्यक्तींनी सदस्यत्वासाठीचा अर्ज सदस्याच्या मृत्यूनंतर सहा महिन्याच्या आत सादर करणे आवश्यक आहे. सदस्य मृत पावल्यानंतर नामनिर्देशित व्यक्ती एकापेक्षा अधिक असतील अशा वेळी सर्वांनी एकत्रितपणे एकच अर्ज संस्थेकडे दाखल करावयाचा आहे आणि या नामनिर्देशित व्यक्ती पैकी सदस्य म्हणून ज्याचे नाव नोंदवावयाचे आहे अशा व्यक्तीचे नाव दर्शवायचे आहे. इतर नामनिर्देशित व्यक्तींची सहसभासद/सहयोगी सदस्य म्हणून नोंद केली जाईल. ज्या वेळेस सर्व नामनिर्देशित व्यक्ती त्यांच्यापैकी एका व्यक्तीस संस्थेचा सदस्य म्हणून दर्शवतील त्यावेळेस इतर नामनिर्देशित व्यक्तींनी, मयत सदस्याचे भांडवल / मालमत्तेत असलेले भाग किंवा हितसंबंध यावर केव्हाही हक्क सांगितल्यास त्याची संस्थेस कोणत्याही प्रकारे झळ पोहोचू दिली जाणार नाही याची हमी म्हणून विहित नमुन्यात हानिरक्षण बंधपत्र द्यावे लागेल. नामनिर्देशनामुळे सदस्य झालेल्या नामनिर्देशित व्यक्तीस मयत सदस्याच्या संस्थेच्या भागभांडवल / मालमत्तेत असलेले भाग व हितसंबंधांवर कायदेशीर व मालकी हक्क शाबित केल्याशिवाय इतर कोणताही हक्क व हितसंबंध निर्माण करता येणार नाही. संस्था अशा नामनिर्देशित सदस्य व्यक्तीने वेगवेगळ्या कायद्यातील तरतुदींचे कायदेशीर हक्क व मालकी शाबित केल्याशिवाय मयत सदस्याचे संस्थेच्या भांडवलात / मालमत्तेत असलेले भाग व हितसंबंध नामनिर्देशित सभासदाकडे हस्तांतरित करणार नाही.
टीप :- नामनिर्देशनामुळे सदस्यत्व प्राप्त झाल्याच्या बाबतीत, असा सदस्य सर्व कायदेशीर वारसांची नोंद घेई पर्यंत “ विश्वस्त ” याद्वारे सदनिका / युनिट धारण करील आणि त्यास मालकी हक्क असणार नाही आणि तो कोणत्याही प्रकारे तिस-या पक्षाचा हितसंबंध निर्माण करणार नाही किंवा अन्यसंक्रामण करणार नाही.
Related Forms
संबंधित तरतुदी
MCS Act, 1960 — Chapter XIII-B
2026 Amendment Rules
← Previous
33. Recording of Nomination or revocations / revisions thereof
Next →
35. Transfer to Legal Heirs Where No Nomination
या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?
मोफत नमुने तयार कराहा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?
उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.
उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.