Bye-law 33Ch.3 · सदस्यत्व
नामनिर्देशनाची नोंद करणे
अधिकृत मजकूर
नामनिर्देशन केल्याची किंवा पूर्वी केलेले नामनिर्देशन रद्द केल्याची /त्यात सुधारणा केल्याची नोंद करणे.
33. नामनिर्देशन नमुना किंवा अगोदर केलेले नामनिर्देशन रद्द करण्यासंबंधीचे पत्र प्राप्त झाल्यावर संस्थेच्या सचिवाकडून,ते प्राप्त झाल्याच्या तारखेच्या लगतनंतर भरणाऱ्या समितीच्या सभेपुढे, तो नमुना किंवा ते पत्र इतिवृत्तांत नोंद घेण्यासाठी ठेवण्यात येईल. प्रत्येक नामनिर्देशन किंवा यापूर्वी केलेले नामनिर्देशन रद्द ठरविण्यासंबंधीचे पत्र संस्थेच्या सचिवाद्वारे समितीच्या ज्या सभेत त्याची नोंद घेण्यांत आली होती त्या सभेच्या तारखेपासून 07 दिवसांच्या आत नामनिर्देशनाच्या नोंद पुस्तकात दाखल करण्यात येईल.
संबंधित तरतुदी
MCS Act, 1960 — Chapter XIII-B
2026 Amendment Rules
← Previous
32. Procedure for Nomination by a Member and its revocation / revision
Next →
34. Transfer of Shares to Nominee after Death
या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?
मोफत नमुने तयार कराहा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?
उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.
उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.