← Bye-Laws/#32
EN
Bye-law 32Ch.3 · सदस्यत्व

सदस्याने करावयाच्या नामनिर्देशनाची व ते नामनिर्देशन रद्द करण्याची/सुधारण्याची कार्यपद्धती

अधिकृत मजकूर
सदस्याने करावयाच्या नामनिर्देशनाची व ते नामनिर्देशन रद्द करण्याची /सुधारणा करण्याची कार्यपध्दती 32. संस्थेचा सदस्य/सहयोगी सदस्य विहीत केलेल्या नमुन्यात स्वाक्षरित लेखाद्वारे त्याच्या मृत्यूनंतर त्याचे संस्थेच्या भांडवलात / मालमत्तेत असलेले भाग व /किंवा हितसंबंध पूर्णत: किंवा अंशत: ज्या व्यक्तीकडे किंवा व्यक्तींकडे हस्तांतरित करण्यात येतील, अशा व्यक्तीला किंवा व्यक्तींना नामनिर्देशित करु शकेल. सचिवांकडून नामनिर्देशन अर्ज मिळाल्याची पोच म्हणजेच सदरचे नामनिर्देशन सचिवांनी मान्य केल्याचे समजण्यांत येईल. पहिल्या नामनिर्देशनाच्या नोंदणीसाठी फी आकारली जाणार नाही. सदस्यांस केव्हाही स्वत:च्या सहीने संस्थेच्या सचिवाकडे लेखी अर्ज करुन आधीचे नामनिर्देशन रद्द करता येईल वा त्यात बदल करता येईल. सचिवाकडून आधीचे नामनिर्देशन रद्द करण्याच्या वा त्यात बदल करण्याच्या अर्जाची पोच म्हणजेच पहिले नामनिर्देशन रद्द झाले आहे, असे समजण्यांत येईल. प्रत्येक नवीन नामनिर्देशनासाठी रुपये 100/- एवढी फी आकारली जाईल.

संबंधित तरतुदी

या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?

मोफत नमुने तयार करा

हा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?

उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.

उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.