← Bye-Laws/#35
EN
Bye-law 35Ch.3 · सदस्यत्व

मृत सदस्याचे संस्थेच्या भांडवलातील/मालमत्तेतील भाग व हितसंबंध वारसदारास अगर कायदेशीर प्रतिनिधीस अद करणे

अधिकृत मजकूर
मयत सदस्याचे संस्थेच्या भांडवलातील / मालमत्तेतील भाग व हितसंबंध वारसदाराकडे हस्तांतरित करणे. 35. एखादा सभासद नामनिर्देशन न करता मृत्यू पावल्यास किंवा हस्तांतरणासाठी कोणतीही नामनिर्देशित व्यक्ती पुढे न आल्यास , संस्था सदर सदस्याच्या मृत्यूची लेखी माहिती मिळाल्यापासून सहा महिन्याच्या आत मयत सदस्याचे संस्थेच्या भांडवलातील / मालमत्तेतील भाग किंवा हितसंबंध यांच्या नियोजित हस्तांतरणाबाबत हक्क मागण्या किंवा हरकती मागविण्यासाठी संस्थेच्या सूचना फलकावर दर्शविलेल्या विहित नमुन्यात जाहीर नोटीस प्रदर्शित करुन आवाहन करील, तसेच संस्था सदर जाहीर नोटीस जास्त खपाच्या कमीत कमी दोन स्थानिक वर्तमानपत्रांत प्रसिध्द करील. अशा नोटिशीचा प्रसिध्दीचा सर्व खर्च मयत सदस्याचे संस्थेच्या भांडवलात / मालमत्तेत जे भाग किंवा हितसंबंध असतील त्याच्या किंमतीतून वसूल केला जाईल. सदर नोटीस प्रसिध्द केल्यानंतर नोटिशीच्या अनुरोधाने प्राप्त झालेल्या हक्क, मागण्या वा हरकती लक्षात घेऊन वा प्राप्त परिस्थितीत समितीस योग्य वाटेल अशी चौकशी करुन समिती कोणती व्यक्ती समितीच्या मते मयत सदस्याचा वारसदार वा कायदेशिर प्रतिनिधी आहे, याबाबत निर्णय घेईल. अशी व्यक्ती उपविधी क्र. 17(अ) वा 19 मधील तरतुदींच्या अधीनतेने संस्थेचा सदस्य होण्यास पात्र राहील. परंतु अशा व्यक्तीस सदस्यत्वासाठी द्यावयाच्या विहित नमुन्यातील अर्जासोबत मयत सदस्याचे संस्थेच्या भांडवलातील / मालमत्तेतील भाग व हितसंबंध यावर कधीकाळी कोणी हक्क सांगितल्यास त्याची संस्थेस कोणत्याही प्रकारे झळ पोहोचू दिली जाणार नाही याची हमी म्हणून हानिरक्षण बंधपत्र लिहून द्यावे लागेल. एकापेक्षा अधिक हक्कदार असतील तर संस्था त्यांना त्यापैकी कोणी संस्थेचे सदस्य व्हावे या संबंधी प्रतिज्ञापत्र करण्यास सांगेल, आणि अशा प्रतिज्ञापत्रात निर्देशिलेल्या व्यक्तीने संस्थेच्या सदस्यत्वाच्या अर्जासोबत वर निर्दिष्ट केल्याप्रमाणे हानिरक्षण बंधपत्र लिहून दिले पाहिजे. तथापि कोणती व्यक्ती मयत सदस्याची कायदेशीर वारसदार अगर कायदेशीर प्रतिनिधी आहे या संबंधात समिती निर्णय घेवू शकत नसल्यास किंवा हक्कदारांपैकी कोणी संस्थेचे सदस्य व्हावे या संबंधी त्यांच्यात एकमत होऊन करार होऊ शकत नसल्यास समिती त्यांना सक्षम न्यायालयाकडून उत्तराधिकार प्रमाणपत्र सादर करण्यास सांगेल. तथापि कोणही हक्कदार पुढे न आल्यास मयत सदस्याचे संस्थेच्या भांडवलातील / मालमत्तेतील भाग व हितसंबंध संस्थेकडे निहित (vest) होतील.

संबंधित तरतुदी

या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?

मोफत नमुने तयार करा

हा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?

उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.

उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.