← Bye-Laws/#36
EN
Bye-law 36Ch.3 · सदस्यत्व

संस्थेच्या भांडवलातील/मालमत्तेतील मृत सदस्याचा भाग व हितसंबंध यांची किंमत

अधिकृत मजकूर
संस्थेच्या भांडवलातील / मालमत्तेतील मयत सदस्याचा भाग व हितसंबंध यांची किंमत नामनिर्देशित व्यक्तीला/व्यक्तींना अदा करणे. 36. नामनिर्देशन केलेली व्यक्ती एकच असेल व त्याने संस्थेच्या भांडवलातील / मालमत्तेतील मयत सदस्याच्या भागाच्या व हितसंबंधांच्या किंमतीची मागणी केल्यास संस्था सदर भाग व हितसंबंध स्वत: संपादन करील व उपविधी क्र. 63 अन्वये तरतूद करण्यात आल्याप्रमाणे येणारी रक्कम नामनिर्देशित केलेल्या व्यक्तीस अदा करील. तथापि, जर नामनिर्देशित केलेल्या व्यक्ती एकापेक्षा जास्त असतील व त्यांनी संस्थेच्या भांडवलातील / मालमत्तेतील मयत सदस्याच्या भागाच्या व हितसंबंधांच्या किंमतीची मागणी केली तर संस्था सदर भाग व हितसंबंध स्वत: संपादन करील आणि वर निर्दिष्ट केलेल्या उपविधी अन्वये त्याची येणारी किंमत नामनिर्देशन पत्रात नमूद केलेल्या प्रमाणात अदा करील. नामनिर्देशनपत्रात असे प्रमाण उल्लेखिलेले नसल्यास रक्कम समप्रमाणात विभागून दिली जाईल.

या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?

मोफत नमुने तयार करा

हा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?

उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.

उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.