← Bye-Laws/#37
EN
Bye-law 37Ch.3 · सदस्यत्व

संस्थेच्या भांडवलातील/मालमत्तेतील मृत सदस्याचे भाग व हितसंबंध यांची किंमत वारसदारास अगर कायदेशीर प्रतिनिधीस अद करणे

अधिकृत मजकूर
संस्थेच्या भांडवलातील / मालमत्तेतील मयत सदस्याचे भाग व हितसंबंध यांची किंमत वारसदारास अगर कायदेशीर प्रतिनिधीस अदा करणे. 37) जर समितीच्या मते, मयत सदस्याचा फक्त एकच वारसदार / कायदेशीर प्रतिनिधी असेल व तो संस्थेच्या भांडवलातील / मालमत्तेतील मयत सदस्याचे भाग व हितसंबंध यांच्या किंमतीची मागणी करीत असेल तर संस्था सदर भाग व हितसंबंध स्वत: संपादन करु शकेल व उपविधी क्र. 35 मध्ये निर्देशित केल्याप्रमाणे हानिरक्षण बंधपत्र लिहून घेऊन , उपविधी क्र. 63 अन्वये तदतूद केल्याप्रमाणे त्यांची येणारी किंमत अदा करु शकेल. जर समितीच्या मते, एकापेक्षा अधिक वारसदार वा कायदेशीर प्रतिनिधी असतील व ते संस्थेच्या भांडवलातील / मालमत्तेतील मयत सदस्याचे भाग व हितसंबंध यांची किंमत मागत असतील तर संस्था सदर भाग व हितसंबंध संपादन करु शकेल व उपविधी क्र. 35 मध्ये निर्देशित केल्याप्रमाणे सर्व वारसदारांकडून / कायदेशीर प्रतिनिधींकडून हानिरक्षण बंधपत्र लिहून घेऊन उपविधी क्र. 64 अन्वये तरतूद केल्याप्रमाणे किंमत समप्रमाणात विभागून देऊ शकेल.

या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?

मोफत नमुने तयार करा

हा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?

उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.

उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.