Bye-law 55Ch.3 · सदस्यत्व
एखाद्या व्यक्तीचे संस्थेचे सदस्यत्व कोणत्या परिस्थितीत समाप्त होते
अधिकृत मजकूर
एखाद्या व्यक्तीचे संस्थेचे सदस्यत्व कोणत्या परिस्थितीत समाप्त होते.
55. एखाद्या व्यक्तीचे संस्थेचे सदस्यत्व खालील परिस्थितीत समाप्त होईल :
अ) त्याने दिलेला सदस्यत्वाचा राजीनामा समितीने स्वीकारल्यास:
ब) संस्थेच्या भांडवलातील / मालमत्तेतील सर्व भाग व त्याचे हितसंबंध हस्तांतरित झाल्यास;
क) त्याचा मृत्यू झाल्यास ;
ड) त्यास संस्थेच्या सदस्यवर्गातून काढून टाकल्यास ;
ई) सदस्य म्हणून चालू राहण्यासाठी नादार अगर कायदेशिररीत्या नि:समर्थ ठरविला असल्यास;
फ) सदस्याचा ठावठिकाणा सतत सात वर्षे प्राप्त न झाल्यास आणि संस्थेच्या भांडवलातील / मालमत्तेतील सर्व भाग व त्याचे हितसंबंध या बाबतीत कोणीही दावा न केल्यास.
ग) संस्थेच्या मालमत्तेतील सदस्याचे हक्क/मालकी हक्क/ व हितसंबंध कायदेशिररीत्या जप्ती आणून किंवा विक्रीमुळे समाप्त (CESSATION) केले असल्यास.
ह) उपविधी क्र. 39 (ड) खाली तरतूद केल्याप्रमाणे हस्तांतरण रद्दबातल ठरल्यास समिती उपविधी क्र.59 मध्ये दर्शविल्याप्रमाणे याबाबतीत पुढील कार्यवाही करील.
संबंधित तरतुदी
Draft Model Bye-laws 2026
← Previous
54. Eligibility of the expelled Member for readmission
Next →
56. Circumstances under which the person shall cease to be Associate Member
या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?
मोफत नमुने तयार कराहा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?
उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.
उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.