← Bye-Laws/#96
EN
Bye-law 96Ch.6 · सर्वसाधारण सभा

विशेष सर्वसाधारण सभा केव्हा भरवावी

अधिकृत मजकूर
विशेष सर्वसाधारण सभा केव्हा भरवावी. 96. अध्यक्षांच्या परवानगीने किंवा समिती सदस्यांच्या मताधिक्याने संस्थेची विशेष सर्वसाधारण सभा केव्हांही बोलाविता येईल. अशी सभा संस्थेच्या किमान एक पंचमांश सदस्यांनी स्वाक्षऱ्या केलेले लेखी मागणी पत्र किंवा ती संस्था ज्या जिल्हा सहकारी महासंघास संलग्न आहे, त्या जिल्हा सहकारी महासंघाकडून तशी सूचना मिळाल्याच्या तारखेपासून एक महिन्याचे आत बोलाविली पाहिजे. अशा प्रकारे बोलाविण्यांत आलेल्या सभेमध्ये मागणी करण्यात आलेल्या विशेष सर्वसाधारण सभेसाठी तारीख, वेळ व ठिकाण निश्चित करण्यासाठी काढण्यात आलेल्या नोटिशीत नमूद करण्यांत आलेल्या विषयांव्यतिरिक्त कोणताही विषय चर्चेस घेण्यात येणार नाही.

या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?

मोफत नमुने तयार करा

हा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?

उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.

उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.