Bye-law 95Ch.6 · सर्वसाधारण सभा
संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत करावयाची कामे
अधिकृत मजकूर
संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत करावयाची कामे
95. संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत खालील कामे केली जातील :-
अ) मागील वर्षांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या व विशेष सर्वसाधारण सभा भरली असल्यास तिच्या इतिवृत्ताचे वाचन करणे व इतिवृत्तानुसार केलेल्या कार्यवाही नोंद करणे.
2) समितीकडून मागील सहकारी वर्षाच्या कामकाजाचा वार्षिक अहवाल, तसेच नियम 62(1) अन्वये विहीत केलेल्या "एन" नमुन्यांत तयार केलेले मागील सहकारी वर्षाचे उत्पन्न खर्चाचे व मागील सहकारी वर्षाच्या अखेरच्या दिवशीचा ताळेबंद दर्शविणारे हिशेबपत्रक स्वीकारणे.
क) अधिनियमातील कलम 75 (2) (अ) मध्ये तरतूद केल्याप्रमाणे नियुक्त केलेल्या वैधानिक लेखापरीक्षकाकडून मागील सहकारी वर्षाचा लेखापरीक्षा अहवाल विचारात घेणे.
ड) समितीकडून दुरुस्ती अहवाल स्वीकारणे व त्यावर कारवाई करणे.
ई) पुढील आर्थिक वर्षासाठी विचारार्थ म्हणून वार्षिक अर्थसंकल्प सभेसमोर ठेवणे.
फ) चालू वर्षाची वैधानिक लेखापरीक्षा करुन घेण्यासाठी राज्यशासनाने मान्यता दिलेल्या अधिकृत यादीमधील लेखापरीक्षकाची नेमणूक करणे.
ग) कलम 75(2) खाली विहित वार्षिक अहवाल समितीकडून स्वीकारणे.
ह) सहकार अधिनियम, नियम आणि संस्थेच्या उपविधीतील तरतुदीनुसार संस्थेच्या सर्वसाधारण सभेची मंजुरी,सहमती आवश्यक असलेली अन्य कोणतेही विषय विशेषकरुन निर्णय घेण्याची आवश्यकता असलेली प्रकरणे सभेसमोर ठेवणे.
आय) नोंदणी प्राधिकारी, वैधानिक लेखापरीक्षक, शासन, जिल्हाधिकारी, स्थानिक प्राधिकरण किंवा कोणताही अन्य सक्षम प्राधिकारी यांजकडून आलेल्या महत्वाच्या पत्रव्यवहारांवर विचार करणे.
ज) निवडणुकीची योग्य वेळ नजिक आल्यावर त्या घोषित करणे व पार पाडणे.
के) नियमित कार्यसूची समाप्त झाल्यानंतर ज्या विषयांना ठराविक मुदतीची नोटीस देणे गरजेचे असते, असे विषय सोडून अधिनियम , नियम व उपविधी यांच्या तरतुदीअधीन परवानगी दिलेली आहे असे विषयअध्यक्षांच्या परवानगीने सभेसमोर मांडणे.
← Previous
94. Holding of AGM Meeting
Next →
96. When a special general body meeting should be convened
या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?
मोफत नमुने तयार कराहा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?
उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.
उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.