← Bye-Laws/#76
EN
Bye-law 76Ch.5 · मालमत्ता व पार्किंग

बांधकामाचे लेखापरीक्षण (Structural Audit) संस्थेने करून घेण्याबाबत

अधिकृत मजकूर
बांधकामाचे लेखापरीक्षण (Structural Audit) संस्थेने करुन घेण्याबाबत 76. (अ) संस्थेकडून इमारतींचे बांधकाम लेखापरीक्षण (Structural Audit) खालील प्रमाणे करुन घेतले जाईल. (1) 15 ते 30 वर्षे जुन्या इमारतीसाठी :- 5 वर्षातून एकदा (2) 30 वर्षा पेक्षा जास्त जुन्या इमारतीसाठी :- 3 वर्षातून एकदा ब) अशा प्रकारचे बांधकाम लेखापरीक्षण (Structural Audit) हे महानगरपालिका हद्दीमध्ये महापालिकेच्या नामिकेतील मान्यताप्राप्त अभियंत्याकडून करुन घेतले जाईल आणि इतर संस्थांच्या बाबतीत शासनाने मान्यता दिलेल्या स्थापत्य अभियंत्याकडून/वास्तुशास्त्रज्ञाकडून करुन घेतले जाईल आणि त्याची नोंद ठेवण्यात येईल. क) राज्य शासनाच्या आगप्रतिबंधक धोरणाप्रमाणे संस्था ठराविक कालावधीने आगसुरक्षा परीक्षण (Fire Audit) करेल आणि त्याची नोंद ठेवील. ड) संस्था उद्वाहने/उद्वाहके यांची नियतकालिक तपासणी करील आणि त्याची नोंद ठेवील.

या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?

मोफत नमुने तयार करा

हा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?

उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.

उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.