Bye-law 75Ch.5 · मालमत्ता व पार्किंग
खरेदी केलेली सदनिका वितरित केली आहे असे समजणे
अधिकृत मजकूर
खरेदी केलेली सदनिका वितरित केली आहे असे समजणे
75 (अ) मालकी हक्काच्या सदनिकाबाबत अधिनियम,1963 याच्या कलम 4 खाली ज्या सदस्याने, व्यक्तीने /भागीदारी संस्थेने सदनिका खरेदी केली आहे किंवा त्या सदनिकेतील हितसंबंध संस्थेच्या पूर्वपरवानगीने ती सदनिका विद्यमान व्यक्तीकडून हस्तांतरित करुन संपादित केली आहे, अशा सदस्याला विहित नमुन्यातील वितरण पत्रातील अटी व शर्ती यांच्या अधीन राहून तसेच संस्थेने त्यात नंतर केलेले फेरबदल यांस अधीन राहून संस्थेने सदनिका वितरित केली असल्याचे समजण्यात येईल. मात्र विहित अर्जाच्या नमुन्यातील लेटर ऑफ अलॉटमेंटमध्ये निर्देशीत केलेल्या सुधारित केलेल्या अटी व शर्ती याच्या अधीन राहून
सदनिकांच्या वितरणाबाबत धोरण
ब) संस्थेची इमारत / इमारती यामधील सदनिकांचे वितरण सदस्यांना पुढील तत्वावर करण्यात येईल 1) प्रथम आलेल्यास प्रथम 2) संस्थेने वेळोवेळी केलेल्या संपूर्ण रकमेच्या मागणीची पूर्ती केल्यावर 3) सर्व सदस्य मंडळाने सभेत ठरविल्याप्रमाणे चिठ्ठया टाकून 4) संस्थेचा सचिव संबंधित सदस्यांना विहित नमुन्यात सदनिका वितरणाबाबत पत्र देईल आणि ती मिळाल्याबद्दल त्यांच्याकडून खात्री करुन घेईल.
सदनिकांचे वितरण रद्द करणे
क) एखादा सदस्य,संस्थेने उपविधी क्रमांक 75 (अ) खाली केलेल्या पैशाच्या मागणीची समितीने त्याला दिलेल्या कालावधीत, पूर्तता करण्यास कसूर करेल तर त्या सदस्यास सदनिका वितरित करण्याचे रद्द होईल आणि संस्थेचा सचिव समितीच्या सूचनेनुसार संबंधित सदस्यास तसे कळवील. अशा प्रकारे सदनिकांचे वितरण रद्द करण्यांत आलेले असेल तेथे त्या रद्द केलेल्या सदनिका समितीने मंजुरी दिलेल्या सदस्याला दिली जाईल. ज्या सदस्याचे सदनिका वाटप रद्द झाले आहे त्याने समितीच्या आदेशानुसार सर्व रकमेचा भरणा केल्यावर त्याला उपलब्ध असलेली अन्य कोणतीही सदनिका पुनर्वितरित करण्याबाबतचे प्रकरण विचारात घेता येईल.
पूर्ण रक्कम भरल्यावर सदनिकेचा ताबा घेणे.
ड) भागपत्रापोटी द्यावयाची रक्कम, बांधकामाची किंमत, कर्जाच्या हप्त्यांची परतफेड आणि संस्थेने मागणी केलेला अन्य आकार पूर्णपणे दिल्याशिवाय कोणताही सदस्य, त्याला वितरित करण्यात आलेल्या सदनिकेचा ताबा घेण्यासाठी या उपविधीखाली पात्र ठरणार नाही.
समितीच्या संमतीशिवाय सदनिकेचा वापर अन्य कारणासाठी करण्यास अनुमती असणार नाही.
इ) उपरोक्त उपविधीच्या 75 'अ' खाली वितरित करण्यात आले असल्याचे मानण्यात आलेल्या सदनिकेचा वापर, ती संस्थेच्या लेखी परवानगीशिवाय सदनिका वितरण पत्रात दिलेल्या कारणांव्यतिरिक्तच्या कारणांसाठी करण्यात येणार नाही.
संबंधित तरतुदी
MCS Act, 1960 — Chapter XIII-B
← Previous
74. Charge and set off in respect of Shares and interest of a Member of the Society
Next →
76. Society to carry out Structural Audit
या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?
मोफत नमुने तयार कराहा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?
उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.
उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.