Bye-law 68Ch.4 · देय व आकारणी
संस्थेने करावयाची दुरुस्ती व देखभाल
अधिकृत मजकूर
संस्थेने करावयाची दुरुस्ती व देखभाल.
68. पुढे निर्देशीत केलेल्या दुरुस्त्यांचा आणि देखभालीचा खर्च संस्था स्वखर्चाने करेल.
अ) (एक) सर्व अंतर्गत रस्ते
(दोन) कुंपणाच्या भिंती
(तीन) बाहेरील जलवाहिन्या
(चार) पाण्याचे पंप
(पाच) पाणी साठविण्याच्या टाक्या
(सहा) मलनिस्सारण वाहिन्या
(सात) मलकुंड (सेप्टिक टँक्स)
(आठ) जिने (Staircases)
(नऊ) गच्ची आणि तिचे कठडे
(दहा) सर्व सदनिकांची संरचनात्मक दुरुस्ती
(अकरा) जिन्यातील दिवे
(बारा) संस्थेच्या रस्त्याचे दिवे
(तेरा) इमारत / इमारतीच्या बाहेरील भिंती पावसाच्या पाण्यामुळे होणारी गळती यासह सर्व प्रकारची गळती तसेच बाहेरील समाईक जलवाहिन्या तसेच मलनिस्सारण वाहिन्यांमधून होणारी पाण्याची आणि सांडपाण्याची गळती
(चौदा) सदनिकांमधील मुख्य स्विचपर्यंत विजेच्या तारा
(पंधरा) उद्वाहने (Lifts)
(सोळा) गच्चीतून होणाऱ्या पावसाच्या पाण्याच्या गळतीमुळे वरच्या मजल्यावरील सदनिकांचे नासधूस झालेले छत आणि त्याचे प्लॅस्टर
(सतरा) जनरेटर्स (Generators)
(अठरा) सुरक्षाविषयक साधने,सीसी टिव्ही, इंटरकॉम, ग्रुप मोबाईल्स, सामुहिक माहिती प्रसार उपकरणे, धोक्याची सूचना देणारी घंटी
(एकोणीस) रेनवॉटर हार्वेस्टिंग सुविधा
(वीस) सांडपाणी,पावसाचे पाणी वाहून जाणे आणि जल संस्करण संयंत्र
(एकवीस) विनिर्दिष्टपणे वाटप न केलेली सामाईक क्षेत्रे,पोहण्याचा तलाव
(बावीस) जिम (Gymnasium)
(तेवीस) सोना बाथ, कॉफी हाऊस
(चोवीस) सामाईक वाहने उभी करण्याची जागा
(पंचवीस) सौर आणि पर्यायी उर्जा उपकरणे
(सव्वीस) बगिचा
(सतावीस) कम्युनिटी हॉल.
ब) उपविधी क्र. 159 (अ) मध्ये ज्या दुरुस्त्यांचा अंतर्भाव नाही अशा दुरुस्त्या सदस्यांनी स्वखर्चाने केल्या पाहिजेत. शौचालय / सिंकमुळे होणारी अंतर्गत गळती संबंधित सदनिकाधारकाने स्वखर्चाने थांबविली पाहिजे आणि त्याबद्दलची माहिती त्याने संस्थेला दिली पाहिजे.
← Previous
67. Sharing of the Society's Charges by the Members at its meeting
Next →
69. Payment of the Society's Charges
या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?
मोफत नमुने तयार कराहा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?
उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.
उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.