Bye-law 67Ch.4 · देय व आकारणी
संस्थेच्या खर्चाची सदस्यांमध्ये विभागणी
अधिकृत मजकूर
संस्थेच्या खर्चाची सदस्यांमध्ये विभागणी
67 (अ) समिती संस्थेच्या खर्चासाठी प्रत्येक सदस्याचा हिस्सा खालील तत्वावर संविभाजित करील :-
(एक) मालमत्ता कर : स्थानिक प्राधिकरणाने ठरविल्याप्रमाणे ;
(दोन) पाणीपट्टी : प्रत्येक सदनिकेत उपलब्ध करुन देण्यांत आलेल्या नळांच्या आकारांच्या आणि एकूण संख्येच्या प्रमाणात;
(तीन) संस्थेच्या इमारतीच्या / इमारतींच्या देखभालीचा व दुरुस्तीचा खर्च : संस्थेच्या सर्व सदस्य मंडळाने वेळोवेळी सर्वसाधारण ठराविक कालांतराने होणा-या दुरुस्तीचा खर्च भागविण्यासाठी प्रत्येक सदनिकेच्या बांधकाम खर्चाच्या दर साल किमान 0.75 टक्क्याच्या अधीन राहून ठरवून दिलेल्या दराने ;
(चार) (लिफ्टच्या) उद्वाहनाच्या देखभालीचा व दुरुस्तीचा आणि (लिफ्ट) उद्वाहन चालविण्याचा खर्च : ज्या बिल्डींगसाठी लिफ्ट उपलब्ध करुन देण्यात आली आहे त्या बिल्डींग मधील सर्व सदस्यांना सारख्या प्रमाणात, मग ते लिफ्टचा वापर करोत अगर न करोत.
(पाच) कर्जनिवारण निधी (सिंकिंग फंड) : उपविधी क्र. 13 (क) खाली तरतूद केल्याप्रमाणे;
(सहा) सेवाशुल्क : सदनिकांच्या संस्थेला समानतेने विभागून;
(सात) वाहन जागा आकार : उपविधी क्र. 83 व 84 अन्वये संस्थेचे सदस्य मंडळ सभेमध्ये निश्चित करील त्या दराने;
(आठ) थकबाकीवरील व्याज : थकबाकीदार सदस्यांकडून वसूल करावयासाठी उपविधी क्र. 71 अन्वये ठरविलेल्या दराने ;
(नऊ) कर्जाच्या परतफेडीचा हप्ता व त्यावरील व्याज : कर्जपुरवठा करणाऱ्या संस्थेने व्याजासहित निश्चित केलेली प्रत्येक हप्त्याची रक्कम ;
(दहा) भोगवटेतर शुल्क : उपविधी क्र. 43(2) नुसार ठरविलेल्या दराने;
(अकरा) विमा हप्ता : प्रत्येक सदनिकेच्या बांधकाम क्षेत्राच्या प्रमाणात. परंतु विमा कंपनीने व्यापार धंद्याच्या कामासाठी वापरल्या जाणाऱ्या सदनिकेत विशिष्ट प्रकारचा माल साठवण्याबद्दल जादा विम्याचा हप्ता आकारला असेल तर अशा जादा विम्याच्या हप्त्यासाठी जे जबाबदार असतील त्यांना त्याच्या सदनिकांच्या बांधकाम क्षेत्राच्या प्रमाणात अशा जादा हप्त्याच्या रकमेचा भार उचलावा लागेल;
(बारा) भाडेपट्टी : प्रत्येक सदनिकेच्या बांधकाम क्षेत्राच्या प्रमाणात,
(तेरा) शेतीतर कर : प्रत्येक सदनिकेचे बांधकाम क्षेत्र
(चौदा) शिक्षण आणि प्रशिक्षण निधी : दर सदनिकेमागे / दर युनिटमागे दरमहा रु. 10/-
(पंधरा) निवडणूक निधी : निवडणूक प्राधिकरणाने त्यासंबंधी तयार केलेल्या नियमात विहित केल्याप्रमाणे आणि संस्थेच्या सर्वसदस्य मंडळाने सभेत ठरविल्याप्रमाणे सर्व सदस्यांनी सम प्रमाणात ;
(सोळा) कोणताही अन्य आकार : संस्थेचे सर्व सदस्य मंडळ सभा ठरवील त्याप्रमाणे
प्रत्येक सदनिकेच्या संबंधात समितीकडून संस्थेचा खर्च निश्चित करणे.
(ब) उपविधी क्र. 67 (अ) मध्ये निर्धारित केलेल्या तत्वांच्या आधारावर समिती प्रत्येक सदनिकेच्या बाबतीत संस्था शुल्क आकारणी निश्चित करील. मात्र सर्व भूभागांना जरी त्यांचे क्षेत्रफळ कमी-अधीक असले तरी सदरची आकारणी समप्रमाणात असेल
← Previous
66. Break-up of Service Charges of the Society
Next →
68. Repairs and Maintenance by Society
या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?
मोफत नमुने तयार कराहा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?
उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.
उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.