← Bye-Laws/#66
EN
Bye-law 66Ch.4 · देय व आकारणी

संस्थेच्या सेवा खर्चाची विभागणी

अधिकृत मजकूर
संस्थेच्या सेवा खर्चाची विभागणी 66. उपविधी क्र. 65 (7) मध्ये निर्देशिलेल्या संस्थेच्या सेवा-खर्चात पुढील बाबींचा समावेश असेल :- अ) कार्यालयीन कर्मचारी, उद्वाहक (लिफ्टवाला), पहारेकरी, माळी, तसेच इतर अन्य कर्मचारी यांचे वेतन ब) संस्थेस स्वतंत्र कार्यालय अथवा इमारत असल्यास, त्याबाबतचा मालमत्ता कर, वीज खर्च, पाणीपट्टी इ. ; क) छपाई, लेखासामग्री व टपाल खर्च ; ड) संस्थेचे कर्मचारी व समितीतील सदस्य यांचा प्रवास भत्ता व वाहन खर्च ; ई) संस्थेच्या समिती सदस्यांना द्यावयाचे बैठक भत्ते ; फ) महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्यादित कलम 24 अ "शिक्षण निधी" पोटी द्यावयाची वर्गणी ; ग) गृहनिर्माण संस्था महासंघ (हौसिंग फेडरेशन) व जिच्याशी संस्था संलग्न आहे अशी अन्य कोणतीही सहकारी संस्था यांची वार्षिक वर्गणी ; ह) गृहनिर्माण संस्था महासंघ व अन्य कोणतीही सहकारी संस्था यांच्याशी संलग्न होण्याकरीता द्यावयाची प्रवेश फी ; आय)अंतर्गत लेखापरीक्षा फी, सांविधिक लेखापरीक्षा फी, व पुनर्लेखापरीक्षा फी, कोणतीही असल्यास ; ज) सर्वसाधारण सभेच्या तसेच समितीच्या व एखादी उपसमिती असल्यास तिच्या सभांच्या वेळी झालेला खर्च ; के) प्रतिधारण शुल्क, कोर्टकचेरी, कायदेशीर चौकशी या बाबींवरील खर्च ; ळ) सामाईक वीज खर्च ; म) सर्वसदस्य मंडळाने सर्वसाधारण सभेत मान्य केलेल्या इतर खर्चाच्या बाबी. तथापि , असा खर्च संस्था; अधिनियम, नियम उपविधी आणि संस्थेचे पोटनियम यांच्या विरोधाभासात राहणार नाहीत;

संबंधित तरतुदी

या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?

मोफत नमुने तयार करा

हा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?

उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.

उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.