← Bye-Laws/#65
EN
Bye-law 65Ch.4 · देय व आकारणी

संस्थेच्या आकारामध्ये समाविष्ट असलेल्या बाबी

अधिकृत मजकूर
संस्थेच्या आकारामध्ये समाविष्ट असलेल्या बाबी 65. या उपविधीत "आकार- म्हणून निर्दिष्ट केलेला संस्थेचा खर्च व तिचा निधी उभारण्यासाठी सदस्यांकडून गोळा करावयाची वर्गणी यात खाली नमूद केलेल्या बाबींचा समावेश असेल :- अ) मालमत्ता कर ब) पाणीपट्टी क) सामाईक वीज आकार ड) दुरुस्ती व देखभाल निधीतील वर्गणी ई) संस्थेच्या उद्वाहनाची ( लिफ्टची) देखभाल व दुरुस्ती आणि उद्ववाहन (लिफ्ट) चालविण्यासाठी येणारा खर्च फ) कर्जनिवारण निधीसाठी (सिंकिंग फंडासाठी) वर्गणी ग) सेवा आकार ह) पार्किंग आकार (वाहन उभे करण्याच्या जागेचे भाडे ) आय) थकविलेल्या पैशावरील व्याज ज) कर्जाच्या हफ्त्याचीपरतफेड व व्याज के) भोगवटेतर शुल्क ळ) विमा हप्ता म) भाडेपट्टी भाडे न) कृषीतर कर ओ) शिक्षण व प्रशिक्षण निधी प) निवडणूक निधी क्यू) कोणतेही अन्य आकार

संबंधित तरतुदी

या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?

मोफत नमुने तयार करा

हा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?

उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.

उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.