← Bye-Laws/#64
EN
Bye-law 64Ch.4 · देय व आकारणी

संस्थेच्या सभासदाला किंवा माजी सभासदाला त्याचे भाग व हितसंबंध यांची किंमत अद करणे

अधिकृत मजकूर
अर्ज निकालात काढणे. संस्थेच्या सदस्याला किंवा माजी सदस्याला त्याचे भाग व हितसंबंध यांची किंमत अदा करणे. 64. ज्या ज्या वेळी संस्थेच्या भांडवलातील / मालमत्तेतील एखाद्या सदस्याचे भाग व हितसंबंध संपादन केल्यामुळे त्या सदस्यास त्यांची किंमत अदा करण्याचा प्रश्न उद्भवेल त्या त्या वेळी, संस्था खालील कार्यपध्दतीचा अवलंब करील :- (अ) संस्थेच्या भाग भांडवलातील भागपत्रे किंवा हितसंबंध यांचे मूल्यअधिनियमाच्या कलम क्रमांक 29 च्या तरतुदीनुसार आणि महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था नियमावलीच्या नियम 23 नुसार ठरविण्यात येईल. (ब) काढून टाकण्यात आलेल्या सदस्याचे भाग व हितसंबंध यांची संस्थेच्या भांडवलातील / मालमत्तेतील किंमत शासनाने अधिकृत केलेल्या मूल्यांकन करणा-या व्यक्तीकडून करण्यात येईल. (क) संस्थेच्या भांडवलातील / मालमत्तेतील भाग व हितसंबंध यांच्या किंमतीची मागणी झाल्याच्या तारखेपासून किंवा संस्थेने वरील हितसंबंध संपादन केल्याच्या तारखेपासून एक महिन्याचे आंत समिती जास्त खपाच्या किमान दोन वर्तमानपत्रात नोटीस प्रसिध्द करुन व तीच नोटीस संस्थेच्या सूचना फलकावर लावून नोटिशीत नमूद केलेल्या अशा कालावधीमध्ये हितसंबंध संपादन करण्यासाठी चुकते करावयासाठी योजलेल्या किंमतीचे प्रस्ताव मागवील. (ड) प्रस्ताव मिळाल्यावर, समिती आपल्या सभेत, त्यांची छाननी करील व वरील (2) मध्ये निश्चित केल्या प्रमाणे अधिकृत किंमतीपेक्षा कमी नसेल असा सर्वात जास्त रकमेचा प्रस्ताव स्वीकारण्याचा निर्णय घेईल. किंवा संस्थेची समिती अशा प्लॉटची अथवा घराची मूल्यांकाकडून प्रचलित बाजारभावानुसार किंमत निश्चित करेल आणि सदरची किंमत व शासकीय रेडीरेकनरचा दर यापैकी जे अधीक असेल त्या किंमतीत संस्थेच्या संचालक मंडळाने मान्यता दिलेल्या सभासदास हस्तांतरीत / विक्री करता येईल. (ई) नंतर समिती ज्या व्यक्तीने सर्वात जास्त रकमेचा प्रस्ताव दिला असेल अशा व्यक्तीस संस्थेच्या सदस्यत्वासाठी विहित नमुन्यात अर्ज करण्यास व सोबत देवू केलेली किंमत यासाठी संस्थेच्या 10 भागांची किंमत व प्रवेश फी म्हणून रुपये 100/- एवढया रकमेचा दर्शनी धनाकर्ष (डिमांड ड्राफ्ट) देण्याविषयी सूचना देईल. (फ) दर्शनी धनाकर्ष (डिमांड ड्राफ्ट) वटविण्यात आल्यानंतर व सदर व्यक्तीस दिल्यानंतर एक महिन्याच्या आत समिती संस्थेला मिळालेली त्या सदनिकेतील हितसंबंधाची किंमत खालीलप्रमाणे चुकती करण्याची तजवीज करील. (एक) ज्या सदस्याचा राजीनामा समितीने मंजूर केलेला आहे अशा सदस्यास अथवा; (दोन) ज्यांनी संस्थेच्या भांडवलातील / मालमत्तेतील मयत सभासदाच्या भागांच्या व हितसंबंधाच्या किंमतीची मागणी केली असेल ती नामनिर्देशित व्यक्ती / त्या नामनिर्देशित व्यक्ती/ती कायदेशीर वारसदार/त्या कायदेशीर वारसदार यांस (तीन) काढून टाकण्यात आलेल्या सदस्यास त्याच्या भाग भांडवलाच्या रकमेमधून वरील अनुक्रम (1) मध्ये दर्शविल्याप्रमाणे आणि खालील बाबींच्या रकमा वजा करुन:- (1) सदस्याकडून देय असलेली थकबाकीची रक्कम काही असल्यास; (2) वर्तमानपत्रातील नोटीस प्रसिध्द करण्यासाठी झालेला संपूर्ण खर्च; (3) संस्थेच्या भांडवलातील / मालमत्तेतील सदस्याचे भाग व हितसंबंध निकाली काढण्यासाठी झालेला खर्च नामनिर्देशित व्यक्तींना अगर व्यक्तिंना अथवा मयत सदस्याच्या वारसदाराला अथवा वारसदारांना अनुक्रमे उपविधी क्र. 36, 37, व 53 खाली तरतूद केलेल्या पध्दतीने रक्कम अदा करण्यांत येईल.

Community Discussion

Loading comments…

Sign in to ask questions or share insights about this bye-law.

Sign in →

या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?

मोफत नमुने तयार करा

हा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?

उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.

उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.

सर्व उपविधी विनामूल्य वाचा, MCS नमुने मिळवा आणि संस्थेच्या अनुपालन तारखा पाहा.

उपविधी क्र. 64: संस्थेच्या सभासदाला किंवा माजी सभासदाला त्याचे भाग व हितसंबंध यांची किंमत अद करणे | SocietySeWA