Bye-law 63Ch.4 · देय व आकारणी
अर्ज निकाली काढणे
अधिकृत मजकूर
अर्ज निकालात काढणे
63. (अ) खालील कारणास्तव प्राप्त झालेले सर्व अर्ज : उदा.
(एक) सहयोगी व नाममात्र सदस्यत्वासह संस्थेच्या सदस्यत्वासाठी अर्ज,
(दोन) संस्थेच्या भांडवलातील / मालमत्तेमधील भाग आणि हितसंबंध यांच्या हस्तांतरणासाठी दिलेली मंजूरीसाठी अर्ज,
(तीन) सदनिका अगर त्याचा काही भाग, पोटभाडयाने, अगर संमती व परवाना पध्दतीने अगर काळजीवाहू तत्वावर देण्यासाठी परवानगी मिळण्यासाठी अर्ज,
(चार) सदनिकेत जादा बांधकाम व फेरबदल करण्याची परवानगी मिळण्यासाठी अर्ज,
(पाच) वाहनतळ / स्टील्ट यासाठी जागा नेमून देण्यासाठी अर्ज,
(सहा) सदनिकांची अदलाबदल करण्याची परवानगी मिळण्यासाठी अर्ज,
(सात) एकापेक्षा अधिक सदनिका धारण करण्याची परवानगी मिळण्यासाठी अर्ज,
(आठ) सदनिका अभिहस्तांकित करण्यासाठी सदनिका गहाण ठेवण्यासाठी किंवा त्यावर बोजा वा हितसंबंध निर्माण करण्यासाठी परवानगी मिळण्याकरिता अर्ज,
(नऊ) गच्चीच्या वापरासाठी परवानगी मिळण्याकरिता अर्ज, आणि
(दहा) वर विनिर्देशपूर्वक उल्लेख केलेल्या कारणांसाठी नव्हे तर उपविधीखाली तरतूद केलेल्या कोणत्याही कारणासाठी संस्थेच्या सचिवाकडे अर्ज दाखल करता येतील. सचिवाला मिळालेल्या प्रत्येक अर्जाची पोच सचिवामार्फत देण्यात येईल.
ब) अर्ज मिळाल्यावर संस्थेचा सचिव त्याची छाननी करील व त्यात काही उणिवा आढळल्यास त्या अर्ज मिळाल्याच्या तारखेपासून 15 दिवसांचे आंत संबंधित सदस्यांना कळवून त्यांची पूर्तता करण्यास सांगेल.
(क) सर्व बाबतीत पूर्ण असलेले अथवा अपूर्ण असलेले अर्ज, संस्थेचा सचिव, अर्ज मिळाल्याच्या तारखेच्या लगत नंतर होणा-या समितीच्या किंवा यथास्थिति सर्वसदस्य मंडळाच्या सभेपुढे ठेवील.
(ड) समिती यथास्थिति किंवा सर्वसदस्य मंडळ अशा सर्व अर्जांवर आपल्या सभेत विचार करील व त्याबाबत निर्णय घेईल.
(ई) संस्थेच्या सचिवाकडे आलेले सर्व अर्ज ते मिळाल्याच्या तारखेपासून जास्तीत जास्त तीन महिन्यांच्या आंत निकाली काढण्याबाबत समिती खातरजमा करुन घेईल. मात्र जागा पोटभाडयाने देण्याबाबतचाअर्ज एक महिन्यात निकाली काढण्यात येईल.
(फ) समितीने किंवा यथास्थिति सर्वसदस्य मंडळाने काही अर्ज नामंजूर केल्यास नामंजुरीची कारणे सभेच्या इतिवृत्तांतात नमूद करण्यात येतील.
(ग) संस्थेचा सचिव, समितीने किंवा यथास्थिति सर्वसदस्य मंडळाने घेतलेले निर्णय सदस्यास समितीच्या घेतलेल्या निर्णयाच्या तारखेपासूनच 15 दिवसांच्या आंत संबंधित अर्जदारास कळवील व जे अर्ज नामंजूर करण्यांत आले असतील त्यांच्या बाबतीत नामंजुरीची कारणेही सदस्यास कळवील. नाममात्र व सहयोगी सदस्यत्वासाठी आलेल्या अर्जांवर घेतलेला निर्णय संस्थेने अर्ज मिळाल्याच्या तारखेपासून तीन महिन्यांच्या आंत अर्जदारास कळविला नाही तर, अधिनियमातील कलम 22 (2) खालील तरतुदीनुसार अर्जदारास संस्थेचा सदस्य किंवा प्रकरणपरत्वे सहयोगी सदस्य किंवा नाममात्र सदस्य करुन घेतले आहे असे समजण्यांत येईल.
संबंधित तरतुदी
MCS Act, 1960 — Chapter XIII-B
← Previous
62. Liability of the past Member
Next →
64. Payment of Value of Member's Shares and Interest
या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?
मोफत नमुने तयार कराहा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?
उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.
उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.