Bye-law 58Ch.3 · सदस्यत्व
पोटभाडेकर, परवानेदार काळजीवाहक इ. चे नाममात्र सदस्यत्व कोणत्या परिस्थितीत समाप्त होते
अधिकृत मजकूर
पोटभाडेकरु, परवानेदार काळजीवाहक इ. चे नाममात्र सदस्य असल्याचे कोणत्या परिस्थितीत समाप्त होते.
58. पोटभाडेकरु, परवानेदार, किंवा काळजीवाहक किंवा कोणत्याही अन्य मार्गाने सदनिकेचा वा त्याच्या भागाचा कब्जेदार असलेला नाममात्र सदस्य खालील परिस्थितीत असा सदस्य होण्याचे समाप्त होईल ;
अ) त्याचा मृत्यू झाल्यास;
ब) त्याचा राजीनामा समितीने स्वीकारल्यास
क) मूळ सदस्याचे सदस्यत्व समाप्त झाल्यास;
ड) सदनिका किंवा त्याचा भाग ज्या कालावधीसाठी पोटभाडयाने किंवा लीव्ह अँण्ड लायसन्स पध्दतीवर किंवा काळजीवाहू तत्वावर किंवा अन्य तऱ्हेने ताब्यात ठेवण्यासाठी परवानगी दिली होती तो कालावधी समाप्त झाल्यानंतर
टीप : उपविधी क्र. 55, 56,57 आणि 58 यामध्ये वापरलेला 'मूळ' सभासद याचा अर्थ, ज्याच्याबरोबर सहयोगी सदस्य संस्थेची भागपत्रे संयुक्तपणे धारण करीत असेल असा सदस्य, व्यवसाय संस्था, कंपनी किंवा कोणताही अन्य निगम निकाय किंवा ज्याच्या वतीने नाममात्र सदस्य संस्थेच्या इमारतीत सदनिका धारण करतो किंवा जो सदस्य आपली सदनिका किंवा जिचा भाग पोटभाडयाने देणे, लिव्ह ॲण्ड लायसन्स परवाना – नि- संमती पध्दतीवर देणे किंवा काळजीवाहू म्हणून देणे किंवा त्याच्या ताब्यातील भाग अन्य कोणत्याही पध्दतीने देणे यासाठी परवानगी देतो असा सदस्य, असा आहे.
याबाबतीत समिती उपविधी क्र. 59 मध्ये दर्शविल्याप्रमाणे पुढील कार्यवाही करील.
← Previous
57. Circumstances under which the person occupying the flat on behalf of the firm / company ceases to be the nominal Member
Next →
59. Action by the Committee on cases of cessation of Membership of the Society
या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?
मोफत नमुने तयार कराहा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?
उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.
उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.