Bye-law 57Ch.3 · सदस्यत्व
भागीदारी पेढी, कंपनी यांच्यावतीने सदनिकेत राहणाऱ्या व्यक्तीचे नाममात्र सदस्यत्व कोणत्या परिस्थितीत समाप्त होते
अधिकृत मजकूर
भागीदारी पेढी, कंपनी यांचे वतीने सदनिकेत राहणाऱ्या व्यक्तीचे नाममात्र सदस्यत्व कोणत्या परिस्थितीत समाप्त होते.
57. भागीदारी पेढी, कंपनी किंवा अन्य कोणताही निगम-निकाय यांच्या वतीने सदनिकेत राहणारा नाममात्र सदस्य असल्यास त्याचे सदस्यत्व खालील परिस्थितीत समाप्त होईल.
अ) त्याचा मृत्यू झाल्यास;
ब) समितीने त्याचा नाममात्र सदस्यत्वाचा राजीनामा स्वीकारल्यास;
क) ज्यांच्या वतीने तो संस्थेच्या सदनिकेत राहात असेल त्या मूळ सदस्याचे संस्थेचे सदस्यत्व समाप्त झाल्यास;
ड) मूळ सदस्यास सदस्यवर्गातून काढून टाकल्यामुळे त्याचे नाममात्र सदस्यत्व समाप्त झाल्यास;
ई) मूळ सदस्याकडून भोगवटादाराचे नामनिर्देशन रद्द केल्याची सूचना मिळाल्यास;
फ) समिती उपविधी क्र. 59 मध्ये नमूद केल्याप्रमाणे पुढील कार्यवाही करील.
← Previous
56. Circumstances under which the person shall cease to be Associate Member
Next →
58. Circumstances under which a Sub lettee, licensee, caretaker ceases to be the nominal Member
या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?
मोफत नमुने तयार कराहा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?
उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.
उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.