Bye-law 39Ch.3 · सदस्यत्व
हस्तांतरणासाठी अर्ज निकाली काढणे
अधिकृत मजकूर
सदस्याचे संस्थेच्या भांडवलातील / मालमत्तेतील भाग व हितसंबंध हस्तांतरित करण्यासंबंधीचे अर्ज निकाली काढणे.
39(अ) संस्थेच्या भांडवलातील / मालमत्तेतील सदस्याचे भाग व/ किंवा हितसंबंध हस्तांतरित करण्यासाठी आलेले अर्ज निकाली काढताना संस्थेचे सचिव व समिती यांच्याकडून उपविधी क्र. 63 मध्ये नमूद केलेली कार्यपध्दती अनुसरण्यात येईल.
सदस्यत्वासाठी व संस्थेच्या भांडवलातील / मालमत्तेतील भाग व हितसंबंध हस्तांतरण करण्यासाठी आलेला कोणताही अर्ज समितीने किंवा सर्वसाधारण सभेने सहसा नाकारावयाचा नाही.
(ब) सदस्यत्व दाखल करुन घेण्यासाठी किंवा समितीच्या सभेत किंवा यथास्थिति सर्वसाधारण सभेत संस्थेच्या भांडवलातील / मालमत्तेतील भाग व हितसंबंध हस्तांतरण करुन घेण्यासाठी आलेला कोणताही अर्ज हा अधिनियम, नियमावली किंवा संस्थेचे उपविधी किंवा शासनाने त्यात विहीत केलेला कायदेशीर अधिकाराचा वापर करुन जारी केलेला अन्य कोणताही कायदा किंवा काढलेले आदेश यात नमूद केलेल्या तरतुदींची पूर्तता न केल्याचे कारण वगळता अन्य कारणावरुन नाकारता येणार नाही.
संस्थेच्या भांडवलातील / मालमत्तेतील भाग व हितसंबंध हस्तांतरित करण्यासाठी आलेल्या अर्जाबाबत तीन महिन्यांच्या आत कळविण्यात आले नाही तर दाखल करुन घेतल्याचे समजण्यांत येईल.
(क) संस्थेच्या भांडवलातील / मालमत्तेतील भाग व हितसंबंध हस्तांतरित करण्यासाठी आलेल्या अर्जावर समितीचा सर्वसाधारण सभेचा निर्णय जर संस्थेस अर्ज मिळाल्यापासून तीन महिन्याच्या आंत अर्जदारास कळविण्यात आला नाही तर अधिनियमाच्या कलम 22(2) अन्वये तरतूद केल्याप्रमाणे सदर अर्ज स्वीकृत केला आहे, असे समजण्यांत येईल व ज्याचे नाव हस्तांतरण करावयाचे आहे त्यास संस्थेचे सदस्य करुन घेण्यांत आले आहे असे समजण्यांत येईल.
अनधिकृतपणे केलेले हस्तांतरण रद्दबातल ठरेल.
(ड) अधिनियम, नियमावली किंवा उपविधी यातील तरतुदींचे उल्लंघन करुन केलेले कोणतेही हस्तांतरण रद्दबातल ठरेल व असे हस्तांतरण संस्थेस बंधनकारक रहाणार नाही.
संबंधित तरतुदी
MCS Act, 1960 — Chapter XIII-B
← Previous
38. Notice of transfer of Shares and interest in the capital/property of the Society
Next →
40. Rights of Membership when to be exercised by the transferee
या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?
मोफत नमुने तयार कराहा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?
उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.
उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.