← Bye-Laws/#30
EN
Bye-law 30Ch.3 · सदस्यत्व

पोटभाडेकर, परवानेदार किंवा काळजीवाहक यांचा राजीनामा

अधिकृत मजकूर
पोटभाडेकरु, परवानेदार किंवा काळजीवाहक यांचा राजीनामा 30. पोटभाडेकरु, परवानेदार, काळजीवाहक किंवा सदनिकेचा किंवा त्याच्या काही भागाचा कब्जेदार म्हणून ज्यास संस्थेने नाममात्र सदस्य म्हणून दाखल करुन घेतलेले आहे असा नाममात्र सदस्य ज्या सदस्याला समितीने आपली सदनिका अगर त्याचा काही भाग पोटभाडयाने, परवाना पध्दतीने किंवा काळजीवाहक तत्वावर वा अन्य प्रकारे देण्याची परवानगी दिली असेल अशा सदस्यामार्फत संस्थेच्या सचिवाकडे, राजीनाम्याचे पत्र देऊन आपल्या नाममात्र सदस्यत्वाचा राजीनामा देवू शकेल. संस्थेचा सचिव, समितीने स्वीकारण्यासाठी संबंधित सदस्याने रीतसर शिफारस केलेले राजीनामापत्र मिळाल्याच्या लगतनंतर भरलेल्या समितीच्या सभेपुढे ते राजीनामापत्र स्वीकृतीसाठी ठेवील. समितीने राजीनामा स्वीकृत करण्याचा निर्णय घेतल्यास समितीचा निर्णय झाल्याच्या तारखेपासून 15 दिवसांच्या आत संस्थेच्या सचिवाकडून संबंधित सदस्य आणि त्याचा पोटभाडेकरु किंवा परवानेदार किंवा काळजीवाहक किंवा यथास्थिती सदनिकेचा किंवा त्याच्या भागाचा कब्जेदार यांना तो निर्णय कळविण्यांत येईल. जर राजीनामा स्वीकारण्यात आला नाही तर समिती त्याबाबतची कारणे सभेच्या इतिवृत्तात नमूद करील व संस्थेचा सचिव विनिर्दिष्ट केलेल्या मुदतीत संबंधित सदस्यास व त्याच्या पोटभाडेकरुस, परवानेदारास किंवा काळजीवाहकास किंवा कब्जेदारास तो निर्णय कळवील. तीन महिन्यांचे आत समितीने याबाबत निर्णय घेतला नाही तर राजीनामा स्वीकृत झाला असे गृहित धरण्यात येईल.

या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?

मोफत नमुने तयार करा

हा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?

उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.

उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.