← Bye-Laws/#29
EN
Bye-law 29Ch.3 · सदस्यत्व

भागीदारी संस्था कंपनी किंवा अन्य निगम निकाय यांच्यावतीने सदनिकेचा भोगवटा

अधिकृत मजकूर
भागीदारी संस्था कंपनी किंवा अन्य निगम निकाय यांच्या वतीने सदनिकेचा भोगवटा करणा-या नाममात्र सदस्याचा राजीनामा. 29. भागीदारी संस्था, कंपनी किंवा अन्य निगम निकाय यांच्या वतीने सदनिकेत राहणारा नाममात्र सदस्य असेल तर त्याला/तिला ज्यांच्या वतीने तो सदनिकेत राहात असेल ती भागीदारी संस्था, कंपनी किंवा अन्य निगम निकाय यांच्या मार्फत संस्थेच्या सचिवाकडे लेखी पत्र देऊन आपल्या नाममात्र सदस्यत्वाचा राजीनामा देता येईल. संस्थेचा सचिव संबंधित भागीदारी संस्था, कंपनी किंवा अन्य निगम निकाय यांनी रीतसर शिफारस केलेले राजीनामापत्र, ते मिळाल्याच्या लगतनंतर भरलेल्या समितीच्या सभेपुढे स्वीकृतीसाठी ठेवील. राजीनामा स्वीकृत करण्याचा निर्णय घेतल्यास समितीचा निर्णय झाल्याच्या तारखेपासून 15 दिवसांच्या आत संस्थेच्या सचिवाकडून भागीदारी संस्था, कंपनी किंवा अन्य निगम निकाय यांना व नाममात्र सदस्यास तो निर्णय कळविण्यांत येईल. जर राजीनामा स्वीकारण्यात आला नाही तर, समिती त्याबाबतची कारणे सभेच्या इतिवृत्तात नमूद करील व संस्थेचा सचिव वर विनिर्दीष्ट केलेल्या मुदतीत भागीदारी संस्था, कंपनी किंवा अन्य निगम निकाय यांस व नाममात्र सदस्यास समितीचा निर्णय कळवील. तीन महिन्यांचे आत समितीने याबाबत निर्णय घेतला नाही तर राजीनामा स्वीकृत झाला असे गृहित धरण्यांत येईल.

या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?

मोफत नमुने तयार करा

हा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?

उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.

उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.