Bye-law 28Ch.3 · सदस्यत्व
सहयोगी सदस्याचा राजीनामा
⚠ Note: The official MCS Act PDF has a known printing error where bye-law 28 appears twice. This platform uses the corrected numbering.
अधिकृत मजकूर
सहयोगी सदस्याचा राजीनामा
28. सहयोगी सदस्य, ज्या सभासदाबरोबर संयुक्तपणे त्याने संस्थेचे भाग धारण केले असतील त्यांचेमार्फत संस्थेच्या सचिवास राजीनाम्याचे पत्र लिहून केव्हाही आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा देवू शकेल. संस्थेच्या सचिवाला, मूळ सभासदाकडून सहयोगी सभासदाचा राजीनामा स्वीकृत करण्याबद्दलच्या रीतसर शिफारशीसह आलेले सहयोगी सभासदाच्या राजीनाम्याचे पत्र ते मिळाल्याच्या तारखेच्या लगतानंतर भरलेल्या समितीच्या सभेपुढे स्वीकृतीसाठी ठेवील. समितीने सहयोगी सदस्याचा राजीनामा स्वीकारण्याचा निर्णय घेतल्यास, निर्णय घेतल्याच्या तारखेपासून 15 दिवसांच्या आंत संस्थेच्या सचिवाकडून मूळ सभासद व त्याचा सहयोगी सभासद यांना तो निर्णय कळविण्यांत येईल. जर राजीनामा स्वीकारण्यात आला नाही तर समिती तो न स्वीकारल्याची कारणे सभेच्या इतिवृत्तात नमूद करील व संस्थेचा सचिव वर विनिर्दिष्ट केलेल्या मुदतीत सदस्यास व त्याच्या सहयोगी सदस्यास समितीचा निर्णय कळवील. राजीनामा या कालावधीत मंजूर केला नाही तर तो स्वीकृत झाला असे गृहीत धरण्यात येईल.
← Previous
27. Notice of resignation of Membership of the Society
Next →
29. Resignation by a Nominal Member, occupying the flat on behalf of a firm, company or any other body corporate
या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?
मोफत नमुने तयार कराहा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?
उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.
उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.