← Bye-Laws/#27
EN
Bye-law 27Ch.3 · सदस्यत्व

संस्थेच्या सदस्यत्वाच्या राजीनाम्याची नोटीस

अधिकृत मजकूर
संस्थेच्या सदस्यत्वाच्या राजीनाम्याची नोटीस 27 (अ) सदस्यास संस्थेच्या सचिवाकडे नियमावलीच्या नियम 21(1) अन्वये तरतूद केल्याप्रमाणे विहित नमुन्यात तीन महिन्यांची नोटीस देवून आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा देता येईल. संस्थेस अदा करावयाच्या रकमा पूर्ण भरल्या शिवाय राजीनाम्याचा स्वीकार न करणे. (ब) संस्थेस अदा करावयाच्या रकमा पूर्णपणे भरल्याशिवाय संस्थेच्या सदस्यत्वाचा राजीनामा स्वीकारला जाणार नाही. सदस्याकडून संस्थेस देय असलेली अदत्त रक्कम कळविणे. क) राजीनामा देवू इच्छिणाऱ्या सदस्याकडे संस्थेची काही येणे बाकी असेल तर अशा येणे रकमेच्या तपशिलाबाबतची खुलासेवार माहिती देऊन संस्थेचे सचिव राजीनाम्याची नोटीस मिळाल्याच्या तारखेपासून 15 दिवसांचे आंत सदस्याला तसे कळविल आणि राजीनाम्याची नोटीस मिळाल्यापासून 30 दिवसांचे आंत ती रक्कम भरण्यास सांगेल. सदस्याकडून येणे बाकी नसल्यास राजीनामा स्वीकारणे (ड) सदस्याकडून संस्थेस काहीही येणे बाकी नसेल तर, समिती अशा सदस्याचा राजीनामा स्वीकारील व राजीनाम्यांची नोटीस मिळाल्याच्या तारखेपासून 3 महिन्याच्या आंत सचिवांकडून सदस्यास तसे कळविण्यांत येईल. राजीनामा अस्वीकृत केल्यास त्याची कारणे कळविणे. (इ) समितीने कोणताही राजीनामा स्वीकारला नाही तर, समिती त्याबाबतच्या कारणांची नोंद घेईल आणि तसे संबंधित सदस्यास, सदर कारणे राजीनाम्याची नोटीस मिळाल्याच्या तारखेपासून तीन महिन्यांचे आत कळवील.

या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?

मोफत नमुने तयार करा

हा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?

उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.

उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.