Bye-law 22Ch.3 · सदस्यत्व
सदस्यांचे हक्क
अधिकृत मजकूर
सदस्यांचे हक्क
22. अ) सदस्य हे अधिनियम, नियम व उपविधी यांत तरतूद केल्याप्रमाणे असे हक्क वापरण्यास हक्कदार राहतील परंतु कोणत्याही सदस्याला असे हक्क त्यास त्याने सदस्यत्वासाठी संस्थेला अशी रक्कम दिल्याशिवाय किंवा असे हितसंबंध संपादन केल्याशिवाय मिळणार नाहीत.
ब) परंतु आणखी असे की, सदस्यत्वाचा हक्क वापरण्यासंबंधात भाग भांडवलातील सदस्याच्या किमान अंशदानात वाढ झाल्या प्रकरणी संस्था अशा सदस्यांना मागणी नोटीस देईल आणि त्याची पूर्तता करण्यासाठी वाजवी कालावधी देईल.
क) "क्रीयाशील सदस्य" - सदस्याने जर पुढील शर्तीचे पालन केले तर तो किंवा तो / ती क्रीयाशील सदस्य म्हणून राहील :-
(एक) तो किंवा ती अगोदर वर्षाच्या लागोपाठोपाठच्या पाच वर्षांच्या कालावधीत किमान एका सर्वसाधारण सभेस उपस्थित राहिला / राहिली असेल.
परंतु संस्थेच्या सर्वसाधारण सभेत सदस्याची उपस्थिती क्षमापित केली असेल तर या खंडातील कोणतीही गोष्ट लागू होणार नाही.
(दोन) त्याने किंवा तिने संस्थेत सदनिका / गाळा खरेदी केला असेल आणि
(तीन) त्याने / तिने संस्थेचा, देखभाल, सेवा आणि अन्य आकार नियमितपणे भरला असेल.
ड) जो सदस्य क्रीयाशील सदस्य नसेल तो 'अक्रीयाशील ' सदस्य होईल.
ई) प्रत्येक आर्थिक वर्षाअखेरीस संस्था 'क्रीयाशील ' किंवा 'अक्रीयाशील ' सदस्य म्हणून वर्गीकरण करील.
1) संस्था प्रत्येक अक्रीयाशील सदस्यास प्रत्येक वर्षाच्या 31 मार्चनंतर 30 दिवसांच्या कालावधीत उपविधीत विहीत केल्याप्रमाणे परिशिष्ट क्रमांक _________ प्रमाणे त्याच्या वर्गीकरणाबाबत कळवील.
2) एखादा सदस्य ' क्रीयाशील ' किंवा 'अक्रीयाशील ' असल्याचा विवाद उद्भवल्या प्रकरणी, असे वर्गीकरण कळविल्याच्या तारखेपासून 60 दिवसांच्या आत निबंधकाकडे अपील केले जाईल.
फ) 'अक्रीयाशील ' म्हणून वर्गीकरण झालेल्या सदस्याने जर उपविधी क्रमांक 22(क) खालील शर्तींची पूर्तता केल्यास त्याचे पुन्हा सक्रीय सदस्य असे वर्गीकरण केले जाईल.
संबंधित तरतुदी
MCS Act, 1960 — Chapter XIII-B
← Previous
21. Procedure for disposal of Membership Applications
Next →
23. Inspect Society's record and getting copies thereof
या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?
मोफत नमुने तयार कराहा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?
उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.
उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.