Bye-law 159Ch.7 · व्यवस्थापन समिती
संस्थेच्या मालमत्तेच्या दुरुस्तीचे व देखभालीच्या खालील बाबी संस्थेला स्वखर्चाने पार पाडावयाच्या
अधिकृत मजकूर
संस्थेने स्वखर्चाने पार पाडावयाची दुरुस्ती व देखभालीची निरनिराळी कामे
159. संस्थेच्या मालमत्तेच्या दुरुस्तीच्या व देखभालीच्या खालील बाबी संस्थेला स्वखर्चाने पार पाडाव्या लागतील :-
अ) (एक) सर्व अंतर्गत रस्ते
(दोन) आवाराच्या भिंती
(तीन) बाहेरील नळमार्ग
(चार) पाण्याचे पंप
(पाच) पाणी साठवण्याच्या टाक्या
(सहा) मल निस्सारण वाहिन्या
(सात) मलकुंड (सेप्टीक टाक्या)
(आठ) जिने
(नऊ) गच्ची आणि छपराच्या कडेची भींत
(दहा) छप्परे आणि सर्व गाळयांच्या संरचनात्मक दुरुस्त्या
(अकरा) जिन्यावरील दिवे
(बारा) रस्त्यावरील दिवे
(तेरा) इमारत / इमारती यांच्या बाहेरील भींती
(चौदा) सर्व प्रकारच्या पाण्याच्या गळत्या, त्यामध्ये पावसाच्या पाण्यामुळे होणाऱ्या गळत्या आणि बाहेरील सामाईक पाईप आणि मलनिस्सारण वाहिनीतून होणाऱ्या गळत्या यांचाही समावेश होतो
(पंधरा) विद्युत वाहिन्या – सदनिकेमधील मेन स्विचपर्यंतच्या
(सोळा) उद्वाहने
(सतरा) पावसाच्या पाण्याची गळती झाल्यामुळे सर्वात वरील सदनिकेतील खराब झालेले छत व त्यावरील गिलावा
(अठरा) जनरेटर्स
(एकोणीस) सुरक्षा साधने (सीसी टीव्ही, इंटरकॉम, ग्रुप मोबाईल, धोक्याची घंटा)
(वीस) रेन वॉटर हार्वेस्टिंग
(एकवीस) मलप्रणाल,पावसाचे पाणी वाहून जाणे आणि पाणी प्रक्रिया संयंत्र
(बावीस) खास करुन वाटप न केलेली सामाईक क्षेत्रे, तरण तलाव, जिम, सोनाबाथ. (तेवीस) सामाईक वाहनतळ (चोवीस) कॉफी हाऊस ,सौर आणि पर्यायी उर्जा स्त्रोत (पंचवीस) बगिचा (सव्वीस) समाज हॉल;
(सत्तावीस) संस्थेची वायफाय संरचना.
सभासदांनी स्वखर्चाने करावयाच्या दुरुस्त्या.
ब) उपविधी क्र. 159 (अ) मध्ये समाविष्ट नसलेल्या सर्व दुरुस्त्या सदस्यांना स्वत:च्या खर्चाने कराव्या लागतील. शौचालयामुळे, मोरीमुळे होणाऱ्या गळत्या संबंधित सदनिकाधारकाने स्वत:च्या खर्चाने संस्थेची मान्यता घेऊन दुरुस्त केल्या पाहिजेत.
या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?
मोफत नमुने तयार कराहा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?
उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.
उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.