← Bye-Laws/#157
EN
Bye-law 157Ch.7 · व्यवस्थापन समिती

संस्थेच्या मालमत्तेची दुरुस्ती व देखभाल यावर खर्च करावयाच्या मर्यादा

अधिकृत मजकूर
संस्थेच्या मालमत्तेची दुरुस्ती व देखभाल यांवर खर्च करावयाच्या मर्यादा 157 (अ) वित्तीय वर्षामध्ये संस्थेच्या मालमत्तेवरील दुरुस्ती आणि देखभाल यावर खर्च करण्याचे अधिकार समितीला आहेत मात्र एका वेळेचा खर्च खालील दर्शविलेल्या मर्यादेपर्यंतच व्हायला हवा. सभासद संख्या 25 : रु. 25000/- पर्यंत सभासद संख्या 26 ते 50 : रु. 50000/- पर्यंत सभासद संख्या 51 पेक्षा अधिक : रु. 1 लाख पर्यंत. (ब) संस्थेच्या मालमत्तेवरील दुरुस्ती आणि देखभाल यावरील खर्च उपविधी क्र. 157 (अ) मध्ये मर्यादित केल्यापेक्षा जास्त होत असेल तर सर्वसाधारण सभेची पूर्व संमती घेणे आवश्यक आहे. (क) समितीने संस्थेच्या मालमत्तेच्या दुरुस्तीच्या व देखभालीच्या कामासाठी निविदा न मागविता किती मर्यादेपर्यंत खर्च करावा ती मर्यादा ठरविण्याबाबत संस्थेची सर्वसाधारण सभा निर्णय घेईल. ज्या कामाच्या बाबतीत वर ठरविलेल्या मर्यादेपेक्षा करावयाच्या कामाची किंमत जास्त असेल अशा कामाच्या बाबतीत समितीस निविदा मागविणे, त्या सर्वसाधारण सभेपुढे मंजुरीसाठी ठेवणे, वास्तुशास्त्रज्ञाबरोबर (नेमल्यास) व ठेकेदाराबरोबर करार करणे, या कार्यपध्दतीचा अवलंब करावा लागेल पुनर्विकासासाठी वास्तुशास्त्रज्ञाची नेमणूक. (ड) वास्तुशास्त्रज्ञाची नियुक्ती :- संस्थेच्या इमारतीच्या पुनर्विकासासंदर्भात शासन निर्णयानुसार (वेळोवेळी दुरुस्त्या केल्याप्रमाणे) आणि व आर्किटेक्ट वास्तुशास्त्रज्ञ अधिनियम 1972 मधील तरतुदीनुसार, कामकाज चालेल. प्रवर्तकाने वास्तुशास्त्रज्ञाची नियुक्ती केली नसेल तर ती करणे. (इ) प्रवर्तकाने वास्तुशास्त्रज्ञाची नियुक्ती केलेली नसेल तर संस्थेची सर्वसाधारण सभा वास्तुशास्त्रज्ञाची नियुक्ती तिला योग्य वाटतील अशा अटीवर व शर्तीवर आणि वास्तुशास्त्रज्ञ अधिनियिम 1972 मधील तरतुदीनुसार करेल. फ) समिती संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेने मंजूर केलेल्या अटी आणि शर्ती यांच्या आधारे तसेच (आकिर्टेक्ट) वास्तुशास्त्रज्ञ अधिनियम 1972 मधील तरतुदीनुसार करार करेल. बांधकामाचे आराखडे व अंदाजित खर्च ग) वास्तुशास्त्रज्ञ समितीशी सल्ला मसलत करुन इमारत / इमारती यांच्या बांधकामाचे आराखडे, अंदाजित खर्च आणि सुसाध्यता अहवाल तयार करेल, समिती या सर्व बाबी संस्थेच्या सर्वसाधारण सभेसमोर ठेवेल. वास्तुशास्त्रज्ञ संस्थेच्या सर्वसाधारण सभेने मंजूर केल्याप्रमाणे इमारत / इमारतींच्या बांधकामाचे सुसाध्यता अहवालाप्रमाणे आराखडे अंतीमत: मान्य केलेल्या निविदांप्रमाणे मंजुरीसाठी स्थानिक प्राधिकरणाकडे सादर करेल. पुनर्विकासासाठी निविदा मागविणे. ह) दिनांक 03/01/2009 च्या शासन निर्णयामध्ये पुनर्विकासाच्या पध्दतीमध्ये उल्लेखिलेल्याप्रमाणे कार्यपध्दती समिती संस्थेचे नियुक्त केलेल्या वास्तूशास्त्रज्ञाच्या सल्लामसलतीने निविदा मागवील. आय) सचिव त्यांना मिळालेल्या निविदा समितीच्या सभेत उघडील. त्यांची छाननी करण्यात येईल आणि संस्थेच्या वास्तुशास्त्रज्ञाची विचारविनिमय करुन अटी व शर्तींच्या मसुदयासह आपला अहवाल तयार करील व तो अहवाल सर्वसाधारण सभेमध्ये निर्णयासाठी ठेवील. सर्वसाधारण सभेच्या मान्यतेनंतर समिती कंत्राटदाराबरोबर करार करील. ज) संस्थेचा वास्तुशास्त्रज्ञ आणि कंत्राटदार यांच्याबरोबर झालेल्या करार विलेखात कंत्राटी काम पूर्ण करण्याचे बाबतीत काही विवाद उत्पन्न झाल्यास ते, संस्थेने नियुक्त केलेल्या एकमेव लवादाकडे सोपविला जाईल, हा विवाद सोडविण्यासाठी काही अटी घालण्यात येतील.

Community Discussion

Loading comments…

Sign in to ask questions or share insights about this bye-law.

Sign in →

या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?

मोफत नमुने तयार करा

हा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?

उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.

उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.

सर्व उपविधी विनामूल्य वाचा, MCS नमुने मिळवा आणि संस्थेच्या अनुपालन तारखा पाहा.

उपविधी क्र. 157: संस्थेच्या मालमत्तेची दुरुस्ती व देखभाल यावर खर्च करावयाच्या मर्यादा | SocietySeWA