Bye-law 156Ch.7 · व्यवस्थापन समिती
संस्थेच्या मालमत्तेला दुरुस्तीची आवश्यकता आहे किंवा काय हे पाहण्यासाठी तपासणी करणे
अधिकृत मजकूर
संस्थेच्या मालमत्तेला दुरुस्तीची आवश्यकता आहे किंवा काय हे पाहण्यासाठी तपासणी करणे.
156.(अ) संस्थेच्या कोणत्याही सदस्याकडून संस्थेच्या मालमत्तेच्या देखभालीसंबंधी तक्रार आल्यावर संस्थेचा सचिव त्यानुसार किंवा स्वत:हून संस्थेच्या मालमत्तेची वेळोवेळी तपासणी करील (आवश्यकता वाटल्यास त्या कामासाठी नेमण्यांत आलेल्या तांत्रिक तज्ञा समवेत ) आणि त्याला दुरुस्तीची आवश्यकता पटली तर तो तसा अहवाल समितीकडे सादर करील. संस्थेच्या सचिवाने दिलेल्या अहवालावर समिती विचारविनिमय करील आणि कोणत्या दुरुस्त्या करावयाच्या त्याचा निर्णय घेईल.
(ब) संस्थेचे सदस्य जागेच्या तपासणीसाठी आवश्यक ती परवानगी देतील आणि दुरुस्ती व देखभालीसाठी योग्य ते सहकार्य करतील.
← Previous
155. Society's Responsibility to Maintain Property
Next →
157. Limit on Expenditure for Repairs
या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?
मोफत नमुने तयार कराहा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?
उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.
उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.