Bye-law 13Ch.2 · निधी
संस्थेने उभारावयाचे इतर निधी
अधिकृत मजकूर
संस्थेने उभारावयाचे इतर निधी
13. संस्था, या खाली नमूद केलेल्या दरांनी तिच्या सदस्यांकडून अंशदाने घेऊन पुढे उल्लेखिलेले निधी उभारील व प्रस्थापित करील.
अ) संस्थेच्या इमारतीच्या / मालमत्तेच्या नेहमीच्या वारंवार दुरुस्तीवर होणारा खर्च भागविण्यांसाठी सर्वसाधारण सभेत (General Body Meeting) संस्थेच्या इमारतीच्या बांधकामादरम्यान झालेल्या आणि वास्तुशास्त्रज्ञाने प्रमाणित केलेल्या प्रत्येक सदनिकेच्या बांधकाम खर्चाच्या कमीत कमी दरसाल 0.75 टक्क्याच्या अधीन निश्चित केलेल्या दराने दुरुस्ती व देखभाल खर्च असेल.
ब) जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा आणि सदनिकेच्या क्षेत्रफळाच्या आधारे निश्चित केलेल्या दराने निर्णय घेण्यात आल्याप्रमाणे प्रमुख दुरुस्ती निधी असेल. मोठ्या / असामान्य / महत्वाच्या दुरुस्तीवर (Major Repairs Fund) होणारा खर्च भागविण्यासाठी सर्वसाधारण सभा आवश्यकतेनुसार गाळ्याच्या क्षेत्रफळाप्रमाणे प्रत्येक सभासदांकडून गोळा करावयाची रक्कम निश्चित करेल.
क) सर्वसाधारण सभेत ठरविण्यात येईल त्या दराने सभासदांकडून रकमा गोळा करुन 'कर्जनिवारण निधी' (सिंकिंग फंड) उभारण्यात येईल. संस्थेच्या इमारतीच्या बांधकामादरम्यान झालेल्या आणि वास्तुशास्त्रज्ञाने प्रमाणित केलेल्या सदनिकेच्या बांधकाम खर्चाच्या 0.25 टक्क्याच्या अधीन तो उभारण्यात येईल मात्र, त्यामध्ये जमिनीची प्रमाणबध्द किंमत अंतर्भूत असणार नाही.
ड) सदस्यांकडून प्रत्येक सदनिकेमागे दरमहा रु. 10/- एवढी किंवा सर्वसाधारण सभा ठरवील त्याप्रमाणे वर्गणी गोळा करुन शिक्षण व प्रशिक्षण निधी उभारण्यात येईल.
संबंधित तरतुदी
या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?
मोफत नमुने तयार कराहा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?
उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.
उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.