Bye-law 12Ch.2 · निधी
राखीव निधी
अधिकृत मजकूर
राखीव निधी कशा प्रकारे उभा करावयाचा
12. (अ) संस्थेच्या राखीव निधीमध्ये पुढील बाबींचा समावेश असेल
(एक) संस्थेला तिच्या सदस्यांकडून मिळालेली सर्व प्रकारची प्रवेश फी;
(दोन) सभासदांनी भोगवटा हक्कां समवेत आपल्या भागपत्राचे हस्तांतरण केल्यावर संस्थेला तिच्या सदस्यांकडून मिळालेली हस्तांतरण फी;
(तीन) संस्थेचे भागभांडवलात किंवा मालमत्तेत सदस्यांनी आपले हितसंबंध हस्तांतरित केल्यावर संस्थेला मिळालेले हस्तांतरण अधिमूल्य;
(चार) अधिनियमाच्या कलम 66 (1) आणि (2) च्या तरतुदींस अधीन राहून प्रत्येक वर्षी मिळालेल्या निव्वळ नफ्यामधून उक्त निधीत जमा केलेल्या रकमा;
(पाच) संस्थेला विशिष्ट कारणांसाठी मिळालेल्या देणग्याखेरीज तिला मिळालेल्या सर्व देणग्या;
(ब) संस्था उपविधी क्र. 12(अ) एक ते पाच यांत निर्दिष्ट केलेल्या सर्व रकमा गतवर्षीच्या हिशेबांची पत्रके अंतिम स्वरुपात तयार करतांना विनियोजित (वळत्या) करील.
संबंधित तरतुदी
MCS Act, 1960 — Chapter XIII-B
2026 Amendment Rules
← Previous
11. Restriction on incurring liabilities by the Society
Next →
13. Other Funds to be created by the Society
या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?
मोफत नमुने तयार कराहा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?
उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.
उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.