← Bye-Laws/#14
EN
Bye-law 14Ch.2 · निधी

निधीचा विनियोग

अधिकृत मजकूर
निधीचा विनियोग 14. संस्थेस, निधीतील रकमांचा विनियोग खाली नमूद केलेल्या पध्दतीने करता येईल :- अ) राखीव निधी :- संस्थेच्या सर्वसाधारण सभेची मंजुरी घेऊन संस्थेच्या मालमत्तेच्या दुरुस्त्या, त्यांची देखभाल व नूतनीकरण यांवर होणाऱ्या खर्चासाठी, संस्थेला राखीव निधी उपयोगात आणता येईल. ब) दुरुस्ती व देखभाल निधी :- संस्थेच्या सर्वसाधारण सभेची मंजुरी घेऊन समितीस संस्थेच्या मालमत्तेची दुरुस्ती, देखभाल व नूतनीकरण यावरील खर्चासाठी दुरुस्ती व देखभाल निधी उपयोगात आणता येईल. क) कर्जनिवारण निधी :- संस्थेच्या सर्वसाधारण सभेने ठराव मंजूर केल्यावर सोसायटी कर्जनिवारण निधीचा वापर आपली इमारत / आपल्या इमारतींच्या पुनर्बांधणीसाठी किंवा संस्थेच्या वास्तुशास्त्रज्ञाच्या मते आवश्यक वाटेल अशी इमारतीची / इमारतींची संरचनात्मक वाढ किंवा फेरबदल, किंवा मोठया प्रमाणावर दुरुस्ती करण्यासाठी करु शकेल. मात्र, हे बदल किंवा मोठया प्रमाणावरील दुरुस्ती वास्तुशास्त्रज्ञाने प्रमाणित केलेले पाहिजेत आणि सर्वसाधारण सभेने मंजूर केले पाहिजेत. ड) शिक्षण आणि प्रशिक्षण निधी :- अधिनियमाचे कलम 24 (अ) अन्वये तरतूद केल्याप्रमाणे या निधीचा विनियोग करता येईल. सर्व प्रकारच्या निधींचा विनियोग संस्थेच्या सर्वसाधारण सभेच्या पूर्व परवानगीनेच करण्यात येईल.

संबंधित तरतुदी

या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?

मोफत नमुने तयार करा

हा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?

उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.

उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.