Bye-law 108Ch.6 · सर्वसाधारण सभा
सर्वसाधारण सभांच्या इतिवृत्ताची नोंद
अधिकृत मजकूर
सर्वसाधारण सभांच्या इतिवृत्तांची नोंद
108. समिती संस्थेच्या प्रत्येक सर्वसाधारण सभेच्या इतिवृत्ताचा मसुदा ती सभा झाल्याच्या तारखेपासून 03 महिन्यांचे आंत पूर्ण करील व समितीच्या ज्या सभेत इतिवृत्ताचा मसुदा पूर्ण करण्यांत आला असेल त्या सभेच्या तारखेपासून 15 दिवसांचे आत इतिवृत्ताचा मसुदा सदस्यांकडे पाठवला जाईल. संस्थेचे सदस्य त्यांच्या काही प्रतिक्रिया असल्यास इतिवृत्ताचा मसुदा मिळाल्याच्या तारखेपासून 15 दिवसांचे आंत संस्थेच्या सचिवास कळवू शकतील. समिती तिच्या यानंतरच्या सभेत सर्वसाधारण सभेच्या इतिवृत्ताच्या मसुद्यावर सदस्यांकडून काही प्रतिक्रिया आल्या असल्यास त्या विचारांत घेवून अंतिम इतिवृत्त तयार करील व संस्थेच्या सचिवाकरवी वा त्यासंबंधात प्राधिकृत केलेल्या अन्य व्यक्तीकरवी इतिवृत्त पुस्तकात नोंदवून घेण्याची व्यवस्था करील.
← Previous
107. How decisions shall be taken
Next →
109. Cancellation of the previous resolution of the general body meeting
या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?
मोफत नमुने तयार कराहा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?
उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.
उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.