Chapter XI-B — Co-operative Housing Societies
महाराष्ट्र सहकारी संस्था (दुरुस्ती) नियम २०२६ — मराठी मार्गदर्शक
अधिसूचना क्र. Sanini 0321/C.R.41/13-C · १८ जून २०२६ पासून लागू · राजपत्र क्र. 366, २२ जून २०२६. नियम १०६सी-१ ते १०६सी-१४ — प्रत्येक नियमाचा सविस्तर मराठी मार्गदर्शक.
106C-1
गृहनिर्माण संस्थांना लागू नसलेले नियम
नियम ४, १९, नियम २०चा पोट-नियम (१), नियम २२, २५, २७, ३०अ, ३५ ते ४८, ४९ब, ४९क, ५३, ५३क, ६३अ, ६६, ८६अ, ९३ ते १०३ हे गृहनिर्माण संस्थांना लागू होणार नाहीत.
106C-2 · 106C-3
नोंदणी व नाव आरक्षण
नाव आरक्षित करा (नमुना वाय-१ किंवा वाय-२), बँक खाते उघडा, आणि दोन महिन्यांत नोंदणीसाठी अर्ज करा. नाव आरक्षण अर्जावर निबंधकाने ३० दिवसांत निर्णय द्यावा.
106C-3(2)(d)
नोंदणी फी
२५ सदनिकांपर्यंत ₹२,५००; २६-५० साठी ₹५,०००; ५१-२५० साठी ₹७,५००; २५० पेक्षा जास्त ₹१०,०००. मागासवर्ग व लोक आवास संस्थांसाठी ₹५०.
106C-4 · 106C-5 · 106C-6
सभासदत्व — नियमित, सहयोगी व तात्पुरते
प्रवेश शुल्क ₹५०० + किमान ५ समभाग. सहयोगी सभासद (नातेवाईक) लेखी संमतीने मतदान करू शकतात. सदस्याच्या मृत्यूनंतर नामनिर्देशित व्यक्ती नमुना वाय-४ (तात्पुरते) किंवा वाय-५ (कौटुंबिक व्यवस्था) द्वारे अर्ज करतात.
106C-7 · 106C-8 · 106C-9
शिक्षण, प्रशिक्षण व नामनिर्देशन
सहकार शिक्षण व प्रशिक्षण निधीसाठी प्रत्येक सदस्यामागे दरमहा ₹१०. महासंघ वार्षिक ₹१,००० देतात. सभासदांनी हयातीतच नामनिर्देशन साादर करावे.
106C-10 · 106C-11
संस्थेचे निधी — कर्जनिवारण, दुरुस्ती व इतर
कर्जनिवारण निधी: बांधकाम खर्चाच्या किमान ०.२५% प्रतिवर्ष. दुरुस्ती व देखभाल: किमान ०.७५% प्रतिवर्ष. कर्ज मर्यादा: भरणा भाग भांडवल + साठीव निधीच्या १० पट.
106C-12
देखभाल शुल्क व विभाजन
सेवा शुल्क सदनिका संख्येनुसार समान विभाजन. मालमत्ता कर चटई क्षेत्रानुसार. पाणी पट्टी नळांच्या संख्येनुसार. लिफ्ट खर्च त्याच इमारतीतील सदनिकांमध्ये. थकबाकीवर जास्तीत जास्त १२% साधे व्याज. भोगवटेतर शुल्क = सेवा शुल्काच्या १०%.
106C-13
व्यवस्थापन, वार्षिक सभा व पुनर्विकास
वार्षिक सभा गणपूर्ती: दोन-तृतीयांश किंवा २०, जे कमी असेल. व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सहभाग शक्य. निर्णय ५१% बहुमताने. पुनर्विकास: १४ दिवसांची सूचना, दोन-तृतीयांश गणपूर्ती, निबंधक प्रतिनिधी, व्हिडीओ रेकॉर्डिंग.
106C-14 · 154B-29
थकबाकी वसुली
संस्था निबंधकाकडे नमुना वाय-६ व ₹१०० न्यायालय शुल्कासह अर्ज दाखल करते. निबंधक १५ दिवसांत प्रतिवादीस सूचना देतात, दोन्ही बाजू ऐकतात (लक्ष्य: ३ महिने), आणि नमुना वाय-७ मध्ये प्रमाणपत्र देतात. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ अन्वये जमीन महसूल थकबाकी म्हणून वसुली.
आपल्या संस्थेत हीच अडचण आहे?
नियम माहीत असणे वेगळे; तो प्रत्यक्षात लागू करून घेणे वेगळे.
Expert Jurist LLP महाराष्ट्रातील सहकारी गृहनिर्माण संस्था व त्यांच्या सभासदांना याच तरतुदींबाबत सल्ला देते — अनुपालन, सर्वसाधारण सभेची कार्यपद्धती, मागणी नोटीस व थकबाकी वसुली.
MCS नमुने, अनुपालन दिनदर्शिका आणि संपूर्ण उपविधी संग्रह — पूर्णपणे विनामूल्य.