← Bye-Laws/#99
EN
Bye-law 99Ch.6 · सर्वसाधारण सभा

सर्वसाधारण सभेच्या नोटीसीची मुदत

अधिकृत मजकूर
सर्वसाधारण सभेच्या नोटीशीची मुदत 99. वार्षिक सर्वसाधारण सभेच्या बाबतीत 14 पूर्ण दिवसांची व विशेष सर्वसाधारण सभेच्या बाबतीत 5 पूर्ण दिवसांची नोटीस संस्थेच्या सर्व सदस्यांना उपविधी क्र.162 खालील तरतुदीनुसार देण्यात येईल. सदर नोटीशींची प्रत नोंदणी प्राधिकाऱ्याकडे आणि गृहनिर्माण संघाकडे पाठविली पाहिजे. एखाद्या निकडीच्या प्रसंगी समितीने कमी मुदतीची नोटीस देऊन विशेष सर्वसाधारण सभा भरविण्याचा एकमताने निर्णय घेतल्यास त्याप्रमाणे कमी मुदतीची नोटीस देऊनही विशेष सर्वसाधारण सभा बोलविता येईल. एखाद्या निकडीच्या प्रसंगी बोलाविण्यांत आलेल्या अशा बैठकीची विषयपत्रिका आणि बैठकीचे कारण सर्व सदस्यांपर्यंत लेखी स्वरुपात पोहोचले पाहिजे. त्याचप्रमाणे सदर बैठकीमध्ये घेण्यांत आलेले निर्णय अशी बैठक झाल्यापासून दोन दिवसांच्या मुदतीमध्ये सर्व सदस्यांना लेखी स्वरुपात कळविले पाहिजेत.

या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?

मोफत नमुने तयार करा

हा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?

उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.

उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.