← Bye-Laws/#90
EN
Bye-law 90Ch.6 · सर्वसाधारण सभा

संस्थेच्या मुख्य प्रवर्तकाने अभिलेख सुपूर्द करणे

अधिकृत मजकूर
संस्थेच्या मुख्य प्रवर्तकाने अभिलेख सुपूर्द करणे. 90. हंगामी समितीच्या पहिल्या सभेत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची निवडणूक झाल्यानंतर किंवा उपविधी क्र. 88 (ब) खाली नोंदणी प्राधिकाऱ्याने त्याचे नामनिर्देशन केल्यानंतर संस्थेचा मुख्य प्रवर्तक संस्थेचा अभिलेख संस्थेच्या अध्यक्षाकडे किंवा हंगामी समितीने प्राधिकृत केलेल्या तिच्या कोणत्याही सदस्याकडे सुपूर्द करील, त्यामध्ये विशेषत: पुढील गोष्टींचा समावेश असेल :- अ) संस्थेचा सर्व अभिलेख व विशेषकरून नोंदणी प्राधिकाऱ्याकडून परत मिळालेली संस्थेच्या नोंदणी अर्जाची प्रत (ब) नोंदणी प्राधिकाऱ्याने नोंदणी केलेल्या संस्थेच्या उपविधीची प्रत (क) संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र (ड) बँकेत भरणा केलेल्या रकमांचे चलान (ई) वापरलेल्या धनादेशांच्या (चेकच्या) स्थळप्रती व न वापरलेले धनादेशाचे (चेक्सचे) कोरे नमुने (फ) बँकेची पासबुके (ग) त्याने वेगवेगळया पक्षकारांशी केलेल्या करारनाम्यांच्या प्रती (ह) त्याने तयार केलेली लेख्यांची विवरणे (आय) सदस्यत्वाचे अर्ज (ज) प्रवर्तकांची माहिती देणारे विवरणपत्र (के) खर्च केलेल्या रकमांची प्रमाणके (व्हाऊचर्स) (ल) काही शिल्लक असल्यास ती रक्कम (म) जागेचा आराखडा/ बांधकाम योजना (न) संस्थेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त (ओ) नोंदणी प्राधिकाऱ्याशी, स्थानिक प्राधिकरणाशी झालेल्या पत्रव्यवहाराच्या फाईल्स व (प) त्याच्या ताब्यात असलेली स्वत:जवळ काहीही न ठेवता अन्य सर्व कागदपत्रे व संस्थेची मालमत्ता (क्यू) सुपूर्द अहवालाचा दस्तऐवज तयार करणे.

या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?

मोफत नमुने तयार करा

हा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?

उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.

उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.