Bye-law 88Ch.6 · सर्वसाधारण सभा
पहिल्या सर्वसाधारण सभेत करावयाची कामे
अधिकृत मजकूर
पहिल्या सर्वसाधारण सभेत करावयाची कामे
88. अ) संस्थेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेची कामे खाली नमूद केल्याप्रमाणे राहतील.
एक) सभेसाठी अध्यक्षाची निवड करणे.
दोन) प्रवर्तकांव्यतिरिक्त ज्यांनी संस्थेच्या सदस्यत्वासाठी अर्ज केले आहेत अशा नवीन सदस्यांना दाखल करुन घेणे.
तीन) संस्थेच्या मुख्य प्रवर्तकाने, पहिल्या सर्वसाधारण सभेच्या दिनांकापूर्वी 14 दिवसांपर्यंतच्या कालावधीसाठी म्हणजे नोटिशीच्या दिनांकास असल्याप्रमाणे तयार केलेल्या लेख्यांचे विवरणपत्र स्वीकारणे व त्यास मंजुरी देणे.
चार) संस्थेच्या उपविधीअधीन संस्थेची नियमित निवडणूक होईपर्यंतच्या कालावधीसाठी हंगामी समिती स्थापन करणे. समितीस अधिनियम,नियम व उपविधी यांनुसार निवडण्यात आलेल्या समितीस जे अधिकार व कार्याधिकार असतील तेच सर्व अधिकार व कार्याधिकार राहतील.
पाच) बाहेरुन उभारावयाच्या निधीची निश्चित करणे.
सहा) मुख्य प्रवर्तकाकडून (बांधकाम व्यवसायी) संस्थेच्या नांवे मालमत्तेतील हक्क,मालकी हक्क व हितसंबंध हस्तांतरित करुन घेण्याकरीता समितीकडे अधिकार सुपूर्द करणे.
सात) गरज असल्यास त्या वर्षाकरिता अंतर्गत लेखापरीक्षकाची नेमणूक करणे व त्याचे पारिश्रमीक ठरविणे.
आठ) हंगामी समितीच्या कोणत्याही एका सदस्यास हंगामी समितीची पहिली सभा बोलविण्याचे अधिकार देणे.
नऊ) जिल्हयाच्या असलेल्या गृहनिर्माण संघाचा व उपविधी क्र. 6 मध्ये नमूद केलेल्या इतर संस्थांचा सदस्य म्हणून संलग्न होण्याबद्दल विचार करणे.
दहा) जे विषय कार्यक्रम पत्रिकेवर घेण्यासाठी योग्य नोटीस देणे आवश्यक आहे ते खेरीज करुन अध्यक्षांचे परवानगीने अन्य कोणतेही विषय सभेसमोर ठेवणे.
(सदनिका खरेदीदारांसाठीच्या संस्थांकरिता पुढील अतिरिक्त तरतुदी लागू आहेत.)
अकरा) बांधकाम प्रकल्पाच्या अंतिम योजनेच्या आर्थिक व प्रत्यक्ष विविध बाजूच्या संदर्भांत किती बांधकाम झाले आणि किती व्हावयाचे आहे यासंबंधात आढावा घेणे आणि सोसायटीच्या मुख्य प्रवर्तकाचा अहवाल मंजूर करणे.
बारा) संस्थेच्या मुख्य प्रवर्तकाने विक्रेत्या बरोबर संस्थेसाठी भूखंड /इमारत खरेदी करण्याबाबत केलेल्या कराराला मान्यता देणे.
तेरा) बांधकामाच्या जागेचे नियोजन आणि बांधकामाची योजना मंजूर करणे.
चौदा) संस्थेच्या मुख्य प्रवर्तकाने, वास्तुशास्त्रज्ञाची नियुक्ती केलेल्या त्या नियुक्तीला मान्यता देणे किंवा अशी नियुक्ती झालेली नसेल तर वास्तुशास्त्रज्ञाची नियुक्ती करणे किंवा अगोदर नियुक्त करण्यात आलेल्या वास्तुशास्त्रज्ञाच्या जागी नवीन वास्तुशास्त्रज्ञाची नियुक्ती करणे.
नोंदणी प्राधिकाऱ्याकडून हंगामी समितीचे नामनिर्देशन
(ब) जर पहिल्या सर्वसाधारण सभेत, हंगामी समिती निवडली गेलेली नसेल तर, नोंदणी प्राधिकारी अशी समिती व त्याबरोबर एक वर्षाच्या कालावधीसाठी संस्थेचा अध्यक्ष आणि सचिव यांचे नामनिर्देशन करण्यासाठी सक्षम असेल.
← Previous
87. Period of notice for the first general meeting
Next →
89. Minutes of First General Body Meeting
या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?
मोफत नमुने तयार कराहा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?
उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.
उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.