Bye-law 70Ch.4 · देय व आकारणी
संस्थेची आकारणी भरण्यास कसूर झालेल्या प्रकरणात आढावा
अधिकृत मजकूर
संस्थेची आकारणी भरण्यास कसूर झालेल्या प्रकरणात आढावा
70. (अ) अधिनियमातील कलम 73 क अन्वये विहित केल्याप्रमाणे समितीने ठरविलेल्या कालावधीत एखाद्या सदस्याने मागणी नोटीशीत उल्लेखिलेल्या प्रमाणे संस्थेच्या आकारणीचा भरणा केला नाही तर अशा सदस्याने संस्थेची आकारणी भरण्यास कसूर केली आहे असे समजण्यात येईल. संस्थेची आकारणी भरण्यास कसूर झाल्याची प्रकरणे त्यावर जरुर ती पुढील कारवाई करण्यासाठी संस्थेचा सचिव समितीच्या निदर्शनास आणून देईल.
(ब) सभासदाने देखभाल व सेवा शुल्क भरण्यास कसूर केल्यास व समिती अशा सदस्यांविरुध्द अधिनियमातील कलम 91 किंवा 101 खाली वसूलीची कार्यवाही करेल
संबंधित तरतुदी
MCS Act, 1960 — Chapter XIII-B
2026 Amendment Rules
या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?
मोफत नमुने तयार कराहा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?
उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.
उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.