← Bye-Laws/#50
EN
Bye-law 50Ch.3 · सदस्यत्व

सदस्यास काढून टाकण्याची कार्यपद्धती

अधिकृत मजकूर
सदस्याला काढून टाकण्याची कार्यपध्दती 50 (अ) संस्थेच्या सदस्याला काढून टाकण्याच्या प्रकरणी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 च्या कलम 35 अन्वये तरतूद करण्यात आलेल्या पध्दती आणि नियम 28 नुसार कार्यवाही करण्यात येईल. काढून टाकलेल्या सभासदाचे भाग जप्त होणे (ब) सदस्य काढून टाकण्यामध्ये सदस्याने धारण केलेले भाग जप्त करण्याच्या कारवाईचा समावेश असू शकेल. ज्या बाबतीत सदस्याला काढून टाकतांना, त्याचे भागही जप्त करावेत असा समिती निर्णय घेईल त्या बाबतीत, नियमावलीतील नियम क्र. 29 प्रमाणे द्यावयाच्या नोटीशीत, भाग जप्त करण्याचे प्रस्तावित केल्याचा जरुर तो उल्लेख करावा लागेल.

संबंधित तरतुदी

MCS Act, 1960 — Chapter XIII-B

या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?

मोफत नमुने तयार करा

हा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?

उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.

उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.