Bye-law 49Ch.3 · सदस्यत्व
सदस्यास काढून टाकणे
अधिकृत मजकूर
सदस्यास कोणत्या कारणांच्या आधारे सदस्य वर्गातून काढून टाकले जाऊ शकते ती कारणे.
49. पुढील बाबतीत संस्थेच्या कोणत्याही सदस्यास सदस्य वर्गातून काढून टाकता येईल.
अ) त्याने संस्थेच्या देणे रकमा सतत चुकत्या करण्यात कसूर केली असेल तर;
ब) त्याने संस्थेस खोटी माहिती देऊन जाणूनबुजून फसविले असेल तर;
क) त्याने अनैतिक कामासाठी किंवा बेकायदेशीर कृत्यांसाठी आपल्या सदनिकेचा वापर केला असेल तर;
ड) संस्थेच्या उपविधीतील तरतुदींचा भंग करण्याची त्याला सवय असून समितीच्या मते ती कृत्ये गंभीर स्वरुपाची असतील तर;
ई) संस्थेच्या नोंदणीच्या वेळी नोंदणी प्राधिकाऱ्यास, त्याने खोटी माहिती दिली असेल किंवा महत्वाची माहिती देण्यास कसूर केली असेल तर;
फ) जो सदस्य अक्रियाशील सदस्य म्हणून वर्गीकरण करण्यात आलेल्या दिनांकापासून पुढील पाच वर्षातील सर्वसाधारण सभैपैकी किमान एकाही सभेस उपस्थित राहिला नसेल असा अक्रियाशील सदस्य.
संबंधित तरतुदी
MCS Act, 1960 — Chapter XIII-B
या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?
मोफत नमुने तयार कराहा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?
उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.
उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.