Bye-law 48Ch.3 · सदस्यत्व
विशिष्ट प्रकारचा माल साठविण्यावर निबंध
अधिकृत मजकूर
विशिष्ट प्रकारचा माल साठविण्यावर निर्बंध
48. जो माल किंवा पदार्थ ज्वालाग्राही किंवा उपद्रवी असेल किंवा जो माल किंवा पदार्थ साठवण्यासाठी त्या संबंधीच्या कोणत्याही कायद्यानुसार सक्षम प्राधिकाऱ्याची परवानगी / मंजुरी आवश्यक असेल असा कोणत्याही प्रकारचा माल किंवा पदार्थ समितीच्या लेखी पूर्वपरवानगीशिवाय कोणताही सदस्य सदनिकेत ठेवणार नाही किंवा त्याचा साठा करणार नाही.
इतर सदस्यास गैरसोयीचे, उपद्रवकारक वा त्रासदायक होईल असे कोणतेही कृत्य सदनिकेत न करणे.
(अ) कोणताही सदस्य आपल्या सदनिकेत इतर संस्थेच्या इतर सदस्यांना गैरसोईचे, उपद्रवकारक वा त्रासदायक होईल असे कोणतेही कृत्य स्वत: करणार नाही अगर करु देणार नाही अथवा संस्थेच्या सदस्यांच्या सर्वसाधारण सभ्यतेस वा नैतिक मूल्यांस बाधा येईल असे गैरप्रकार करणार नाही.
उपविधी क्र. 48 (क) च्या तरतुदींचा भंग केलेल्या तक्रारींबाबत समितीने कारवाई करणे.
(ब) उपविधी क्र. 48 (अ) मध्ये निर्दिष्ट केलेल्या सर्व अशा बाबींसंबंधात समितीने एकतर आपल्या अगर कोणाकडून तक्रारी आल्यास उपविधी 48 (अ) मध्ये निर्दिष्ट केलेल्या अशा सर्व गैरप्रकारास पायबंद घालण्याची कारवाई करणे कायदेशीर ठरेल.
← Previous
47. Examination of flats and report about Repairs to Flats
Next →
49. Grounds on which a Member could be expelled
या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?
मोफत नमुने तयार कराहा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?
उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.
उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.