← Bye-Laws/#46
EN
Bye-law 46Ch.3 · सदस्यत्व

सदनिकेत जादा बांधकाम व त्यात फेरबदल

अधिकृत मजकूर
सदनिकेचे जादा बांधकाम व त्यात फेरबदल समितीच्या परवानगीने करणे. 46 (अ) कोणताही सदस्य त्याच्या सदनिकेमध्ये, समितीच्या लेखी पूर्वपरवानगीशिवाय कोणत्याही प्रकारचे जादा बांधकाम किंवा त्यात फेरबदल करणार नाही. सदनिकेत करावयाच्या जादा बांधकामसाठी किंवा फेरबदलासाठी परवानगी घेण्याकरीता अर्ज (ब) सदनिकेत जादा बांधकाम अगर त्या बांधकामात फेरबदल करु इच्छिणारा सदस्य संस्थेच्या सचिवाकडे जरुर त्या तपशिलासह अर्ज करील. अशा अर्जावर संस्थेच्या सचिव व समिती यांजकडून उपविधी क्र. 63 मध्ये तरतूद केल्याप्रमाणे पुढील कारवाई करण्यात येईल. (क) संबंधित सक्षम प्राधिकाऱ्याच्या पूर्व परवानगीशिवाय बांधकाम आराखडयात कोणताही बदल करता येणार नाही.

या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?

मोफत नमुने तयार करा

हा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?

उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.

उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.