← Bye-Laws/#18
EN
Bye-law 18Ch.3 · सदस्यत्व

कंपनी कायद्याखाली नोंदलेली संस्था, भागीदारी पेढी इत्यादींची संस्थेच्या सदस्यत्वासाठी पात्रता

अधिकृत मजकूर
कंपनी कायद्याखाली नोंदलेली संस्था, भागीदारीपेढी इत्यादींची संस्थेच्या सदस्यत्वासाठी पात्रता. 18. भारतीय भागीदारी अधिनियम, 1932 खालील नोंदणीकृत भागीदारी संस्था, कंपनी अधिनियम, 1949 खालील नोंदणीकृत कंपनी, संस्था नोंदणी अधिनियम, 1860 खाली नोंदलेली भारतीयसंस्था किंवा महाराष्ट्र सहकारी अधिनियम 1960 खाली नोंदलेली किंवा नोंदली आहे असे मानली जाणारी सहकारी संस्था, स्थानिक प्राधिकरण / राज्य / केंद्र शासन, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 च्या कलम 22(1) (ब), (क), (ड), (इ) आणि (फ) मध्ये तरतूद केल्याप्रमाणे सार्वजनिक विश्वस्त मंडळ, किंवा त्यावेळी अंमलात असलेल्या कायद्याखाली नोंदली गेलेली निगम-निकाय संस्थेचे सदस्यत्व म्हणून दाखल करुन घेण्यास पात्र होऊ शकेल. तथापि भागीदारी संस्था व कंपन्या यांना सदस्य म्हणून दाखल करुन घेणे व त्यांनी सदनिका धारण करणे याबाबत शासनाने अधिनियमाच्या कलम 22 मधील दुसऱ्या परंतुका अन्वये वेळोवेळी काढलेल्या अधिसूचनांद्वारे नियमन केले जाईल. टीप : वर निर्दिष्ट केलेल्या शासकीय अधिसूचनेतील विद्यमान अटी व शर्तींसाठी उपविधीचे जोडपत्र पाहा.

या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?

मोफत नमुने तयार करा

हा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?

उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.

उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.