Bye-law 170Ch.8 · सर्वसाधारण
टेरेसच्या वापरासाठी परवानगी
अधिकृत मजकूर
टेरेसच्या वापरासाठी परवानगी
170. उपविधी क्र. 169 मध्ये काहीही तरतुदी असल्या तरी, समिती संस्थेच्या कोणत्याही सदस्यास टेरेस किंवा संस्थेच्या इमारतीची उपलब्ध जागा, त्याच्या लेखी विनंतीवरुन एखाद्या समारंभासाठी, संस्थेची सर्वसाधारण सभा ठरवील त्या बंधनासह आणि अमुक एवढया आकारासह तात्पुरत्या कारणासाठी वापरण्याकरिता देईल. संस्था स्थानिक प्राधिकरणाच्या परवानगीने आवश्यक असल्यास टेरेससह इमारतीच्या कोणत्याही भागावर, सर्वसाधारण सभा ठरवील त्या अटीवर व शर्तीवर जाहिरात लावण्यास परवानगी देईल तसेच एखादा सदस्य किंवा अनेक सदस्य यांना सौर उर्जेची उपकरणे, टेरेसवर किंवा इमारतीच्या अन्य भागावर बसवावयाची असतील आणि त्यासाठी जागा उपलब्ध असेल तर सौरउर्जा यंत्रणा बसविण्यास संबंधित सदस्यास समिती परवानगी देईल. सौर ऊर्जा यंत्रणेत
(एक) सोलर कलेक्टर स्टँड, गरम आणि थंड पाण्याची टाकी, टाकीसाठी स्टँड, गरम पाण्याचा इत्यादींचा समावेश आहे.
(दोन) सौर उर्जेवरील विद्युतीकरणासाठी पॅनेल्स, बॅटरी, इन्व्हर्टर चार्ज कंट्रोलर, केबलिंग इत्यादींचा समावेश आहे. यासंदर्भात जागा उपलब्ध करण्याकरिता समितीकडे सदस्याचे विनंतीपत्र आल्यानंतर, संस्थेच्या जागेत तशी जागा उपलब्ध असल्यास ती संबंधित सदस्यास उपलब्ध करुन देणे संस्थेला बंधनकारक असेल.
या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?
मोफत नमुने तयार कराहा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?
उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.
उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.