Bye-law 169Ch.8 · सर्वसाधारण
समाईक जागा भाड्याने देणे
अधिकृत मजकूर
सामाईक जागा पोटभाडयाने देणे.
169. संस्था, जिन्या खालील मोकळी जमीन, गच्च्या/खुली जमीन/हिरवळ/क्लब हाऊस, सामाईक हॉल इत्यादी कोणाही व्यक्तीला - मग ती व्यक्ती संस्थेची सभासद असो वा नसो, कोणत्याही कारणासाठी लीव्ह लायसन्स पध्दतीने किंवा पोटभाडयाने देणार नाही.
अ) सर्व सदस्यांच्या वापरसाठी असलेल्या सर्व खुल्या जागा, सामाईक जागा उदा. जिना, पाय-या, उतरण्याच्या जागा, वाहने ठेवण्याच्या जागा, उद्वाहन, कॉरीडोअर आणि अशा अन्य जागा कोणताही सदस्य स्वत:च्या वापरासाठी ताब्यात घेऊ शकणार नाही. अशा जागा ज्या कारणांसाठी आहेत त्याच कारणांसाठी निर्बंधित करण्यात येतील. जो कोणी सदस्य वरील शर्तींचा, अतिक्रमण करुन भंग करताना आढळेल त्याला हे अतिक्रमण मोकळे करावे लागेल. एवढेंच नव्हे तर त्याला / तिला, त्याने / तिने जितका काळ अशा जागांवर अतिक्रमण केले असेल त्या कालावधीसाठी दरमहाच्या देखभालीच्या पांचपट देखभाल खर्च द्यावा लागेल. तसेंच सदस्यांनी संस्थेच्या आणि संबंधित पालिका आणि सक्षम प्राधिका-यांच्या पूर्व परवानगी शिवाय मंजूर आराखडयापेक्षा अधिक प्रमाणात, बांधकामे आणि संरचनात्मक दुरुस्त्या करता कामा नये.
तसेच सदस्यांनी सदनिका / युनिट त्या उद्देशासाठी आहे / मंजूर केले आहे, त्याच उद्देशासाठी वापरले पाहिजे.
या निदेशांचा भंग करणा-या सदस्यास पूर्वलक्षी प्रभावाने, जितक्या कालावधीसाठी हे अतिक्रमण केले असेल तितक्या कालावधीसाठी दरमहा देण्यात यावयाचा देखभाल खर्चाचा पांचपट देखभाल खर्च संस्थेला द्यावा लागेल.
या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?
मोफत नमुने तयार कराहा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?
उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.
उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.