Bye-law 171Ch.8 · सर्वसाधारण
संस्थेच्या सभासदांना दस्तऐवजांच्या नकल पुरविण्याबद्दल नक्कल फाचे दर
अधिकृत मजकूर
संस्थेच्या सभासदांना दस्तऐवजांच्या नकला पुरविण्याबद्दल नक्कल फीचे दर
171. संस्थेच्या सदस्यांना खालील दस्तऐवजांच्या प्रमाणित नकलांची गरज असल्यास त्यांच्यापुढे दिलेली फी भरावी लागेल : संस्थेच्या सदस्यांना दस्तऐवजांच्या नकला पुरविण्याबद्दल नक्कल फी चे दर :-
| 1. संस्थेच्या मान्यताप्राप्त उपविधीची प्रमाणित प्रत | प्रत्येक पानास रुपये 5/- |
| 2. संस्थेच्या उपविधीतील सुधारणा | प्रत्येक पानास रुपये 5/- |
| 3. संस्थेच्या लेखापरीक्षकांनी तपासलेला मागील ताळेबंद | प्रत्येक पानास 10/- रुपये |
| 4. संस्थेच्या सदस्यत्वासाठी अर्ज | प्रत्येक पानास रु. 25/- |
| 5. संस्थेच्या सदस्याने दिलेले दुसरे व त्यानंतर नामनिर्देशन पत्र | प्रत्येक पानास रु. 100/- |
| 6. संस्थेचे भागपत्र (दुबार प्रत) | प्रत्येक पानास रु. 100/- |
| 7. संस्थेच्या सदस्यांची यादी | प्रत्येक पानास रु. 10/- |
| 8. पत्रव्यवहार (सदस्यांशी संबंधित) | प्रत्येक पानास रु. 5/- |
| 9. संस्थेच्या सर्वसाधारण सभेचे किंवा समिती सभेचे इतिवृत्त | प्रत्येक पानास रु. 10/- |
| 10. हानिरक्षण बंधपत्र | प्रत्येक पानास रु. 20/- |
| 11. लेखापरीक्षा अहवाल / वार्षिक माहिती / नियतकालिक माहिती अहवाल | प्रत्येक पानास रु. 5/- |
| 12. अक्रियाशील सभासद यादी | प्रत्येक पानास रु. 5/- |
| 13. अधिनियमाच्या कलम 32 अन्वये इतर कागदपत्रे | प्रत्येक पानास रु. 5/- |
संबंधित तरतुदी
MCS Act, 1960 — Chapter XIII-B
या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?
मोफत नमुने तयार कराहा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?
उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.
उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.