Bye-law 166Ch.8 · सर्वसाधारण
संस्थेच्या उपविधीत सुधारणा
अधिकृत मजकूर
संस्थेच्या उपविधीत सुधारणा
166. संस्थेच्या उपविधीत कोणत्याही नवीन उपविधी समाविष्ट करावयाच्या असल्यास किंवा सध्याच्या उपविधीत फेरबदल करावयाचा असल्यास किंवा कोणताही उपविधी रद्दबातल करावयाचा असल्यास :-
(एक) तो प्रस्ताव ज्या सर्वसाधारण सभेत विचारात घेण्याचे योजिले असेल त्या सभेच्या 14 दिवस अगोदर सर्व सदस्यांना सदर प्रस्ताव कळवण्यात आल्याशिवाय ;
(दोन) संस्थेच्या सर्वसाधारण सभेत उपस्थित असलेल्या व मतदान करणा-या सदस्यांच्या किमान दोन तृतीयांशपेक्षा कमी नसलेल्या मताधिक्याने त्यासंबंधीचा ठराव संमत झाल्याशिवाय;
(तीन) नवीन उपविधी तयार करणे, त्यात फेरबदल करणे व तो रद्दबातल करणे यांस नोंदणी प्राधिका-याने मान्यता दिल्याशिवाय आणि त्याने त्याबद्दलची नोंद केल्याशिवाय तसे करता येणार नाही.
संबंधित तरतुदी
MCS Act, 1960 — Chapter XIII-B
या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?
मोफत नमुने तयार कराहा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?
उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.
उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.