← Bye-Laws/#165
EN
Bye-law 165Ch.8 · सर्वसाधारण

संस्थेच्या उपविधीतील तरतुदींच्या भंग बद्दल दंड

अधिकृत मजकूर
संस्थेच्या उपविधीतील तरतुदींच्या भंगाबद्दल दंड. 165. अ) संस्थेच्या उपविधींच्या निरनिराळया भंगांसाठी संस्थेची सर्वसाधारण सभा दंडाची रक्कम ठरवील. सदस्याने उपविधीच्या / उपविधींच्या कोणत्या क्रमांकाचा/ क्रमांकांचा भंग केला आहे, हे, संस्थेचा सचिव समितीच्या सूचनेवरुन सदस्याच्या निदर्शनास आणून देईल. त्या सदस्याने उपविधीचा / उपविधींचा भंग करण्याचे चालूच ठेवले तर, उपविधी / उपविधींचा भंग केल्याबद्दल दंड का ठोठावण्यात येऊ नये' याबद्दल सदस्यास कारणे दाखवा नोटीस बजावील. त्या संस्थेची सर्वसाधारण सभा त्या सदस्यास त्याचे म्हणणे मांडण्याची संधी देईल व ते ऐकून घेईल आणि त्यानंतर त्याला एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त एकत्रितपणे रु. 5000/- पेक्षा अधिक नाही, एवढया रकमेचा दंड आकारील. ब) अधिनियमात अन्यथा तरतूद केली असेल त्याव्यतिरिक्त वार्षिक सर्वसाधारण सभा / विशेष सर्वसाधारण सभा, सदस्यांच्या बेजबाबदार कृत्याबद्दल दंडाची शिक्षा देऊ शकतील. दंडाची रक्कम वाजवी असली पाहिजे आणि सर्व दोषी सदस्यांसाठी ती सारखी असली पाहिजे. वार्षिक सर्वसाधारण सभेत / विशेष सर्वसाधारण सभेत दंडाची रक्कम निश्चित करण्याचा अधिकार प्रदान करण्यात आला आहे. संस्थेची व्यवस्थापक समिती ही दंडाची रक्कम काळजीपूर्वक वसूल करेल.

या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?

मोफत नमुने तयार करा

हा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?

उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.

उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.