Bye-law 164Ch.8 · सर्वसाधारण
संस्थेचा सूचना फलक
अधिकृत मजकूर
संस्थेचा सूचनाफलक.
164. संस्थेकडे इमारतीच्या ठळक जागी लावलेला सूचना फलक असेल. या फलकावर उपविधी क्र. 162 (अ) मध्ये नमूद केलेल्या सर्व नोटिसा आणि अन्य माहिती प्रदर्शित करण्यात येईल त्याचप्रमाणे हिशेबपत्रक, वार्षिक अहवाल आणि सदस्यांना महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 1960; महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, 1961 आणि सहकारी संस्थांचे उपविधी यांखाली जी माहिती देणे आवश्यक आहे ती माहिती या सूचना फलकावर प्रदर्शित करण्यात येईल. संस्थेच्या एकापेक्षा अधिक इमारती असतील तर अशा सर्व इमारतींमध्ये बसविलेल्या सूचना फलकावर ही माहिती प्रदर्शित केली जाईल.
या उपविधीशी संबंधित कागदपत्रे हवी आहेत?
मोफत नमुने तयार कराहा उपविधी लागू करून घ्यायचा आहे?
उपविधीचा उपयोग तो योग्य रीतीने वापरला तरच होतो.
उपविधी दुरुस्ती, सर्वसाधारण सभेचे ठराव, सभासदांचे वाद, निबंधकांकडील अर्ज — Expert Jurist LLP महाराष्ट्रातील संस्थांसाठी हे संपूर्ण काम पाहते.